सामाजिक

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्री.पीरसाहेब-हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफ यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला संपन्न !!

img 20260315 wa0143
motion photo 1994122415623448876

पंचनामा प्रतिनिधी – वडगावपीर (ता.आंबेगाव) येथे हिंदू मुस्लिम एकयाचे प्रतिक असलेल्या श्री.पीरसाहेब-हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफ यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात आला.या आखाड्यात १०१/- ते १११०१/- रुपयांपर्यंत पैलवानांना बक्षिसे देण्यात आली.

या आखाड्यात मावळ,मुळशी,खेड,जुन्नर,शिरूर,पारनेर,भोसरी,रंगमनेर येथील नामवंत पैलवानांनी हजेरी लावली.या कुस्त्यांच्या आखाड्यात पै.गोरक्ष सासवडे, विजय आदक, विकास आदक, विशाल आदक, दिनकर आदक, विजय राजगुडे, नानाभाऊ मांदळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

img 20260315 wa0143

या कुस्त्याच्या आखाड्या निमित्त शरद बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सदस्य विवेक वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व बाजार समितीचे माजी अध्यक्ष देवदत निकम, जिल्हा परिषदेच माजी उपाध्याक्ष अरुण गिरे,अभासे महिलाध्यक्षा आशाताई अरुण गवळी, अभिजीतराजे खाणविलकर, डी.रावजी(राजस्थान ), विजय गायकवाड, सुनील वाडकर,पै सुनील होळकर, उद्योजक संपत बोत्रे,गजानन गुळवे, फकिरा आदक, शिवाभाई आदक, माजी सरपंच संजय पोखरकर, चेअरमन दिलीप पोखरकर व गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी, विठ्ठल परिवार, शिवछत्रपती ग्राममविकास प्रतिष्ठान व जनसेवक ॲड.पै.अवधुत राजगुडे, तानाजी राजगुडे व कुस्ती शौकिन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कुस्त्याच्या आखाड्यात महिला पैलवानांनी सुद्धा आपली झलक दाखविली.यावेळी नावाजलेले पैलवान जाजवल्य सदावर्ते व महारुद्र सदावर्ते या बंधूनी आखाड्यात उतरून आपल्या ताकतीची झलक दाखविली.या वेळी महिला पै.श्रेया होळकर व सिध्दी होळकर या बहिनींची कुस्ती लावण्यात आली.हि महिला कुस्ती आखाड्याचे आकर्षण ठरली. शेवटची कुस्ती निखिल वाघ ( पहाडधरा ) विरुद्ध अक्षय खंडागळे (मंचर ) यांच्या मध्ये झाली. या कुस्तीत निखिल यांने अक्षयला असमान दाखवले हे त्याला कळले सुद्धा नाही.ग्रामस्थांनी निखिल वाघ यास उचलून घेऊन आनंद साजरा केला.

motion photo 8914228693449492638

या वर्षाच्या आखाड्याचे वैशिष्टय म्हणजे मानाच्या नऊ कुस्त्यांनी उपस्थितीची वावा मिळवली. तसेच अनेक कुस्त्या निकाली झाल्या.

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील कुस्त्याच्या आखाड्यात शेवटची निकाली कुस्ती झाल्यानंतर मानाची गदा व सन्मान चिन्ह देताना मान्यवर.

img 20260315 wa0199
fb img 1771121534243

Related posts

समर्थ मध्ये सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ;डिजिटल अरेस्ट म्हणजे सायबर फसवणूक- एच.डी.एफ.सी बँकचे क्लस्टर हेड रोहित तेंडुलकर यांचे प्रतिपादन

Chief Editor

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा; पुण्यात एकाच वेळी घोडनदी, कुकडी, मीना नदी सह होणार ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम !!

Chief Editor

ग्रामपंचायत शिंगवेच्या वतीने संविधान जनजागृती !!

Chief Editor

Leave a Comment