सामाजिक

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील कापडदरा वस्तीवरील रस्ता वहिवाटीचा वाद २५ वर्षांनंतर मिटला!!

img 20260110 wa0448

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथील कापडदरा या वस्तीवरील गेले पंचवीस वर्षाचा रस्त्याचे वहिवाटीचा वाद तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाने पोलीस प्रशासन मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांचे उपस्थितीत अडथळा दूर करण्यात आला.

img 20260110 wa0452

दरम्यान जारकरवाडी येथील कापडदरा वस्तीवरील गेली २५ वर्षे शेतकऱ्यांमध्ये रस्त्याबाबत आपापसात वाद होते.त्यामुळे सदर वस्तीवरील शेतकऱ्यांना जाणे येण्यासाठी, शेतीची मशागत करण्यासाठी तसेच शाळेतील मुलांना जाणे येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे या सर्व अडचणी लक्षात घेत गावातील, वस्तीवरील शेतकरी कैलास कापडी, संतोष कापडी, चंद्रकांत कापडी, एकनाथ कापडी, मच्छिंद्र वैद्य, गणेश कापडी, अरुण भोजने, अनिल कापडी, आबा कापडी, अक्षय कापडी, विठ्ठल विधाटे, शिवाजी विधाटे, मनोहर कापडी, सोमनाथ कापडी, नरेंद्र लबडे, दशरथ लबडे सर्व राहणार जारकरवाडी कापडदरा यांनी एकत्रित बैठक घेऊन विचार करून आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ प्रमाणे रस्त्याचा अडथळा दूर करण्यासाठी अर्ज केला.

त्यानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये अनेक सुनावण्या झाल्या वादी प्रतिवादींचे जाब जबाब झाले आणि त्यानंतर आंबेगावचे तहसीलदार यांनी सर्व घटनेची स्थळ पाहणी करण्याचे ठरविले आणि लागलीच जारकरवाडी कापडदरा या ठिकाणी तलाठी, मंडळ अधिकारी आणि स्वतः उपस्थित राहून स्थळ पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांना निदर्शनात आले की या ठिकाणी शेतकऱ्यांना, शाळेतील मुलांना वाहिवटीसाठी रस्त्याचा अडथळा निर्माण होत आहे.

img 20260110 wa0450

त्यानंतर आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी लागलीच सदर रस्त्याच्या केसा अभ्यास करून व स्थळ पाहणी पाहिले असता अर्जदारांचा अर्ज मान्य केला आणि प्रतिवादी यांना मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ०५ अन्वये कायमस्वरूपी सक्त मनाई करण्यात येत आहे तसेच सदर आदेशाचा अवमान केल्यास मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 214 अन्वये भारतीय संहिता 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई संबंधितांविरोध करण्याचे निर्देश देण्यात आले..

त्यानुसार तक्रारी अर्जदार यांनी तत्कालीन तहसीलदार सचिन वाघ यांचे आदेशान्वये जारकरवाडी गावचे ग्राम महसूल अधिकारी संतोष साळोखे तसेच पारगाव तर्फे अवसरी बुद्रुकचे मंडळ अधिकारी सुरेश तळपे पारगाव पोलीस स्टेशनचे तांबे पोलीस तसेच त्यांचे सहकारी पोखरकर मॅडम यांचे समावेत रस्ता खुला करण्यात आला.

img 20260108 wa0203

सदर ठिकाणी आंबेगाव तालुका शिवपानंद शेत रस्ता महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शरद पवळे दादासाहेब जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष बबन दाभाडे उपाध्यक्ष दत्तात्रय लोखंडे सचिव चंद्रकांत कापडी व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थितीत होते.

Related posts

धामणी (लोणी) च्या वेदमूर्ती मंदार क्षिरसागर यांना ॠग्वेद पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) येथील शिंदे मळ्यात बिबट्याचा वावर; कुत्र्यावर हल्ला !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे मानाच्या काठ्यांची मिरवणूक !!

Chief Editor

Leave a Comment