
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – जारकरवाडी येथे स्व.खंडू (दादा) कारभारी भांड यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा श्रद्धा व भावनिक वातावरणात पार पडला.
प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त ह.भ.प. श्रावणीताई विलास महाराज करंडे यांचे सुश्राव्य हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते. कीर्तनास ह.भ.प.बाळशीराम लोखंडे, ह.भ.प. संदीप महाराज तसेच सर्व टाळकरी मंडळींची साथ लाभली. कीर्तनाचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात व उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास जारकरवाडी गावातील समस्त ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. तसेच पारगाव गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच श्वेता किरण ढोबळे,उपसरपंच विठ्ठल ढोबळे व पारगाव येथील समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

कार्यक्रम प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र जयराम ढोबळे तसेच अण्णासाहेब आवटे यांचे नातू अजय आवटे यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. याचबरोबर पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष अरुणगिरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार साहेब गट) अध्यक्ष देवदत्त निकम, निरगुडसर गावचे सरपंच रवींद्र वळसे,राजू वळसे,संतोष कोरके,अंकिता वाळुंज,रोहिणी दिलीप वाळुंज, तेजस्विनी ॲग्रोटेकचे नितीन ढोबळे, तसेच भाजपा आंबेगाव पूर्व मंडल अध्यक्ष किरण वाळुंज यांनी उपस्थिती लावली होती.

तसेच जारकरवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष ॲड. रूपालीताई दत्तात्रेय भोजने यांनी फोनद्वारे संपर्क साधून स्व.खंडू दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्व.खंडू दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक व माणुसकीपूर्ण कार्याचा गौरव केला.

जारकरवाडी, पारगाव तसेच विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

