सामाजिक

वडगावपीर- मांदळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप पोखरकर यांची बिनविरोध निवड !!

img 20260218 wa0390

पंचनामा (प्रा.अरुण गोरडे)- वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील वडगावपीर- मांदळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिलीप पोखरकर यांची बिनविरोध निवड झाली.

ठरल्या प्रमाणे सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम रामचंद्र आदक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी मंचर येथे संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी विवेक वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली.यावेळी अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विवेक वाघमारे यांनी दिलीप पोखरकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.संस्थेचे सचिव निवृत्ती सिनलकर यांनी या कामात सहकार्य केले.

img 20260218 wa0392

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड यांच्या हस्ते नूतन अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सोसायटीचे उपाध्याक्ष बाळू आदक व सर्व संचालक उपस्थित होते.

या सोसायटीचे ६५९ सभासदांच्या माध्यमातून शेती व शेतीपूरक व्यवसायाला कर्ज पुरवठा करणारी तालुक्यातील एक अग्रगण्य सोसायटी आहे.सोसायटीचे भागभांडवल सोळा लाख रुपये असून चालू वर्षी कर्जवाटप ५ कोटी ४५ लाख रुपये केले आहे.तर सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप केल्याचे सचिव निवृत्ती सिनलकर यांनी सांगितले.यापुढेही सोसायटीच्या सभासंदाना शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करू असे नूतन अध्यक्ष दिलीप पोखरकर यांनी सांगितले.

fb img 1771121541695

Related posts

आमरण उपोषणासाठी बसलेल्या धामणी गावच्या ग्रामस्थांना परिसरातील गावांनी दिला जाहीर पाठिंबा; पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत केली चर्चा !!

Chief Editor

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी;अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी !!

Chief Editor

जिद्द,कष्ट आणि यशाचा सुवर्णमहोत्सव; निरगुडसरच्या डॉ.शितल शिंदेची राज्यात दुसरी क्रमांकाची झेप !!

Chief Editor

Leave a Comment