सामाजिक

तमाशाकडे पाहण्याचा रसिक मायबापांचा दृष्टिकोन चांगला; तमाशा कलेवर रसिकांचे आजही प्रेम !!

img 20260217 wa0651

साभार लेख- विनोद सम्राट विनोद अवसरीकर यांच्या केलेस अर्पण

शब्दांकन- राजेंद्र डी. मोरे (बारामती)

पंचनामा संपादकीय – वर्षानुवर्ष तमाशा कला टिकून आहे आजही टिकून आहे आणि उद्याही टिकून राहणार आहे.याचे प्रमुख कारण तमाशासाठी रसिकांचा दृष्टिकोन अतिशय सुंदर आहे ,तमाशा कलेवर रसिकांचे खूप मोठे प्रेम आहे. त्यांना तमाशा शिवाय करमत नाही. गावची यात्रा आली की, तमाशा शिवाय दुसरे मनोरंजन त्यांना दिसत नाही.
तमाशाकला हा रसिकांच्या अभिमानाचा, आवडीचा विषय आहे.

तमाशातील कलावंताना राष्ट्रपती पदक मिळाले ,तमाशा पद्यश्री झाला, शासनाचे अनेक पुरस्कार तमाशा कलावंतांना मिळतात .मानधन मिळते. हे सर्व तमाशा कलेबद्दल चांगला दृष्टिकोन असल्याचे लक्षण आहे. तमाशा हा घराघरापर्यंत माणसाच्या मनामनामध्ये कोरला आहे. वयोवृद्ध ,तरुण मंडळी सह स्त्रिया लहान मुले तमाशा एकत्र बसून पाहतात. गावात तमाशाफड आल्यानंतर अजूनही दिवाळी दसरा
असल्यासारखा आनंद होतो.

तमाशाला आजपर्यंत तमाशाला कोणी बदनाम केलेले नाही ,तमाशा बदनाम होणार नाही आणि भविष्यातही तमाशाला कोणी बदनाम करेल अशी शक्ती निर्माण होणार नाही. कारण रसिकांच्या मनामध्ये तमाशा कोरलेला आहे, ते त्यांच्या आनंदाचे आणि समाधानाचे ठिकाण आहे. तमाशा कला उच्चज्ञानाची अवस्था आहे. कधीही नष्ट न होणारे वरदान तमाशा कलेला लाभलेले आहे.

कार्यक्रमात बसलेले चार-पाच टुकार हुल्लडबाजी करतात म्हणून सर्वच तमाशा रसिक असे आहेत असे नाही. आजही तमाशा कलावंताकडे मान सन्मानाने पाहिले जाते. त्यांचे कलासादरीकरण आजही मनापासून पहिले, ऐकले जाते.

फडमालक ,कलावंतांना आर्थिक प्राप्ती ही तमाशा कलेतूनच होत असते. तमाशा फडावर जगणारे प्रत्येक जण रसिकांच्या सहकार्यावर आश्रयावर जगत असतात. मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तमाशा. रसिकांना जागृत करण्याचे
एकमेव साधन म्हणजे तमाशा. यात्रेत रसिक गर्दीचे उच्चांक मोडले जातात. केलेबद्दल आजही आतुरता कमी झालेली नाही.

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक माणसाला संघर्ष आहे ,तो
फडमालक आणि कलावंतांना देखील आहे. संघर्षातून कोणीही सुटलेला नाही. जोपर्यंत मानव जात आहे तोपर्यंत तमाशा टिकणार आहे. कारण तमाशाला सूर्य चंद्राचे तेज आहे.

आजही आधुनिक काळातही तमाशा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय स्वच्छ व सुंदर आहे.

img 20260217 wa0651

तमाशा अभ्यासक बाबाजी कोरडेसर, डॉ.शिवाजी शेळके, पूर्वीचे तमाशा कलावंत,लेखक , दिग्दर्शक, निर्माता मा.रामदासजी राऊतसर, राजेंद्र.डी.मोरे,कलारसिक

Related posts

बदलत्या हवामानाचा होतोय आंब्याच्या मोहोरावर परिणाम; गावरान सह कलमी आंब्याच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज !!

Chief Editor

मंचर (ता.आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिनव पद्धतीने केले अभिवादन !!

Chief Editor

जीवन प्रवासात “भाग्य” हे लिप्ट सारख आहे तर “मेहनत” ही शीडी सारखी आहे..!!

Chief Editor

Leave a Comment