सामाजिक

शुगर इथेनॉल बायोएनर्जी कॉन्फरन्स मध्ये शुगर इंडस्ट्रीज परिवार चा गौरव

1009860609

पंचनामा प्रतिनिधी – शुगर इंडस्ट्रीज परिवार ची स्थापना कै. अविनाश कुटे पाटील यांनी मार्च 2015 मध्ये केली होती परन्तु कोरोना काळात त्यांचे दुर्दैवी निधन झाले . त्यांच्या पश्चात सदर कमिटीने श्री.दिलीप वारे यांची या ग्रुपचे एडमीन म्हणून नियुक्ती केली . श्री दिलीप वारे यांनी अतिशय वेळ देऊन व तळमळीने या परिवार साठी काम केले, व ग्रुप सदस्यांची संख्या प्रचंड अशी वाढवली . ग्रुपच्या स्थापणेस या वर्षी 11 वर्ष पूर्ण झालेत , प्रत्येक वर्धापण दिनास श्री. वारे वेगवेगळे उपक्रम घेत असतात, जसे की साखर व्यासायाशी निगडित विषय घेऊन व्हाट्सआप वर ऑनलाइन व्याख्यान माला , दररोज एका वक्त्याचे सायंकाळी 7 वाजता व्हाट्सआप ग्रुपवर व्याख्यान प्रसारित होत असते, दररोज किंवा सदस्यांच्या सोयीनुसार सायंकाळी 6 वाजता शुगर विषयक चर्चासत्र ( प्रश्न मंजुषा कार्यक्रम ) व त्यास ग्रुपमधील तज्ञ मान्यवर उत्तरे देतात. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांमधील सर्व शुगर विषयक पोस्ट संकलित करून दररोज ग्रुपवर शुगर विषयक बातम्यांचा अपडेट देत असतात.

दिनांक १२ आणि १३ जून २०२६ रोजी, हॉटेल वेस्टीन पोवई लेक, मुंबई येथे “शुगर, इथेनॉल व बायोएनर्जी ” या विषयावर चिनी मंडी व जे. के. इंडिया ग्रुप कडून आंतरराष्ट्रीय प्रीमियम कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. भारतातील साखर व्यवसायाशी निगडित असलेल्या मान्यवर ‘Chini mandi’ या संस्थेने या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. रावसाहेब दानवे यांनी केले व दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नितीन जी गडकरी साहेब ऑन लाईन उपस्थित होते.

या भव्य कॉन्फरन्समध्ये आपल्या ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ चे काम, कार्य, उद्देश , व संघटन आणि सातत्य पाहून, त्यांनी या परिवाराला कार्यक्रमाचे ‘Associate Partner’ म्हणून समाविष्ट केले आणि या परिवाराचा एक मोठा गौरव केला.

1009860613

आज ११,५०० पेक्षा अधिक सदस्य जोडून, हा परिवार महाराष्ट्रातीलच नव्हे, तर कदाचित देशातीलही सर्वात मोठा व्हाट्सआप ग्रुप ठरला आहे. एक व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून काय साध्य होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. अनेक मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या बरोबरीने आज आपला हा सोशल मीडिया ग्रुप चा लोगो व ग्रुप अभिमानाने उभा आहे, हे यावरून दिसून येते.

हे सर्व यश, हे सर्व श्रेय अर्थातच शुगर इंडस्ट्रीज परिवार मधील सर्व सदस्यांना जाते. मी फक्त तुमचा एक प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित होतो , आणि ‘चिनीमंडी’ संस्थेचे चेअरमन माननीय श्री. जितू भाई शाह यांच्या हस्ते ही मानाची ट्रॉफी स्वीकारलेली आहे.असे दिलीप वारे यांनी सांगितले. याप्रसंगी अनेक साखर कारखान्यांचे अधिकारी , खातेप्रमुख , चेअरमन ,कार्यकारी संचालक , जनरल मॅनेजर या सर्व मान्यवरांची भेट झाली . व सर्वांनी आपल्या सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आणि आम्ही आपल्या ग्रुपवरील पोस्ट आवर्जून बघतो असेच सांगितले , या ग्रुपमुळे अनेकांना रोजगार मिळतो तसेच अद्ययावत माहिती मिळते हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले .
एकूण 17 व्हाट्सआप ग्रुप व सर्व ग्रुप मिळून 11500 पेक्षा अधिक सदस्य आहेत , त्यात महाराष्ट्रातील प्रगत ऊस उत्पादक शेतकरी ,सर्व कारखान्या चे कर्मचारी अधिकारी , कामगार , कार्यकारी संचालक,अनेक कारखान्यांचे चेअरमन खाजगी साखर कारखान्यांचे मालक, जनरल मॅनेजर , डायरेक्टर इत्यादी मान्यवर समाविष्ट आहे व वरील काम सातत्याने सुरू असून सर्वांसाठी ( ग्रुपची नियमावली मान्य असल्यास ) विनामूल्य आहे

1009850407
1009828026

Related posts

निरगुडसर मंडळ कार्यक्षेत्रात कृषी अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा !!

Chief Editor

मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

अवसरी बुद्रुक येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण !!

Chief Editor

Leave a Comment