राज्यस्तरीय ओबीसी मेळाव्यात श्री.अरुण मडके सर यांना डाॅ.पंजाबराव देशमूख ओबीसी रत्न पुरस्काराने सन्मानित!!
राज्यस्तरीय ओबीसी मेळाव्यात अरूण मडके सर यांना डाॅ पंजाबराव देशमूख ओबीसी रत्न पुरस्काराने सन्मानित!!
राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे पहिले राज्य अधिवेशन गजानन महाराज यांच्या पूण्यभूमीत पांडूरंग कृपा कुणबी समाज भवन शेगांव जि. बुलढाणा येथे दि.१९/११/२०२३ रोजी संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष सन्मा. श्री डॉ. बबनराव तायवाडे अध्यक्ष स्थानी होते. या कार्यक्रमामध्ये ओबीसी मागण्यांसाठी आमरण उपोषणाची भुमिका घेणारे श्री रविंद्र टोंगे व विजय बल्की यांचा विशे़ष सन्मान करण्यात आला. या अधिवेशनामध्ये राज्यभरातील ओबीसी चळवळीमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या कर्मचारी अधिकारी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.त्यावेळी कर्मचारी अधिकारी महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष मा. श्री अरूण मडके यांना पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय ओबीसी रत्न पुरस्कार व ठाणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री पुरुषोत्तम ठाकरे यांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच पदोन्नती आरक्षण,बिंदुनामावली निश्चित करणे,कंत्राटीकरण थांबवणे, जुनी पेंशन योजना लागू करणे,ओबीसींना सरसकट नाॅन क्रिमिलार दाखला देणे अशा कर्मचा-यांच्या विविध मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले.
या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ओबीसी नाॅन क्रिमिलेअर,महाज्योती याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले व कर्मचा-यांना पुढील राष्ट्रीय अधिवेशनासाठी अमृतसर येथे येण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी सन्मा.आमदार संजय कुटे,आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर आडबाले यांनी ओबीसींच्या मागणीला पाठिंबा देत ओबीसींना अश्वस्त केले. याशिवाय सरचिटणिस मा. श्री सचिन राजूरकर,प्रदेशाध्यक्ष मा. श्री. डॉ. प्रकाश भांगरथ ,कर्मचारी अधिकारी विभागाचे राज्याध्यक्ष मा.श्यामभाऊ लेडे,सरचिटणीस मा.अनिल नाचपल्ले, मा. श्री. भालचंद्र ठाकरे, मा. श्री दत्तात्रेय शेलवले, मा. श्री. मधुकर शिंदे, मा. श्री वसंत भेरे यांसह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सदर अधिवेशनासाठी ठाणे जिल्ह्यातुन मा. श्री केशव करण . मा. श्री कुमार वेखंडे , मा.सौ. दिपीका भोईर, मा. श्री, दत्तात्रय पानसरे , मा. श्री . विष्णू शेलवले, मा.विष्णू पांढरे, मा. श्री भरत पांढरे, श्री. दिलीप भोईर, श्री रविंद्र चौधरी ,भिवंडी तालुका अध्यक्ष श्री शरद बागूल , श्री संतोष वेखंडे , श्री प्रमोद तारमळे , आशा निचिते, कल्पना ऐगडे, संध्या पानसरे, कामिनी वेखंडे, सुरेखा निचिते, आशा चौधरी, शर्मिला तारमळे, वैशाली मडके, सुनंदा पांढरे, चंद्रकला वेखंडे, सुनंदा बागूल, कविता वेखंडे , कांता शेलवले, चंद्रकांत वेखंडे, तसेच राष्टीय ओबीसी महासंघाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.