आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल शहापूरच्या विद्यार्थी व शिक्षकांचे शहापूर तालुका पातळीवरील विज्ञान प्रदर्शनात द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत दमदार कामगिरी!!

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल शहापूरच्या विद्यार्थी व शिक्षकांचे शहापूर तालुका पातळीवरील विज्ञान प्रदर्शनात द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत दमदार कामगिरी!!
तालुकास्तरीय 52 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन डोलखांब, शहापूर येथे नुकतेच पार पडले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल, शहापूर चे विद्यार्थी – कु.तिवारी नवनीत निरंजन,
कु.लोखंडे दक्ष विठ्ठल,
कु.कवठणकर यश हेमंत
या विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रकल्प सादर केला.
सदर प्रकल्पास शहापूर तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळाला असून त्याची जिल्हा पातळीसाठी निवड झाली आहे. तसेच विज्ञान शिक्षिका सौ. सारिका धरम यांच्या शैक्षणिक साहित्याने द्वितीय क्रमांक मिळविला.
शहापूर तालुक्यातून असंख्य विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता.
सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादाने, समस्त संत पिठाच्या प्रेरणेने, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे माननीय अध्यक्ष श्री. नंदकुमार सूर्यवंशी साहेब व शाखा शहापूरचे कार्याध्यक्ष माननीय श्री. उमेश जाधव साहेब तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने सदर विद्यार्थी व शिक्षक यांनी यश मिळविले.
सदर विज्ञान प्रदर्शन सहभागासाठी प्राचार्य श्री. कैलास थोरात, उपप्राचार्य सौ. दिपाली खांडगे, सौ सारिका धरम, कु. योगिता धेनक यांनी अथक परिश्रम घेतले .