ग्रामपंचायत पारगाव (शिंगवे) च्या माध्यमातून संकल्प महाराष्ट्राचा वाचनालय पंधरवडा चे आयोजन!!
ग्रामपंचायत पारगाव (शिंगवे) च्या माध्यमातून संकल्प महाराष्ट्राचा वाचनालय पंधरवडा चे आयोजन!!
ग्रामपंचायत पारगाव (शिंगवे) च्या माध्यमातून संकल्प महाराष्ट्राचा वाचनालय पंधरवडा चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीचे पूजन करून आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगमेश्वर विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव शाळेतील मुलांनी पुस्तकांचे वाचन केले.
मुलांना शिक्षणाबरोबर सामाजिक, राजकीय ज्ञान तसेच थोरामोठ्यांचा इतिहास अवगत झाला पाहिजे म्हणून शाळेतील मुलांनी अनेक विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तके वाचून आपले सामाजिक ज्ञान वाढवले पाहिजे असे मत सरपंच श्वेताताई ढोबळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
वेळी उपसरपंच नितीनशेठ ढोबळे, ग्रामपंचायत सदस्या गीतांजलीताई लोंढे, रोहिणीताई देवडे, अंकिता ताई लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य किरणशेठ ढोबळे, वीरेंद्रशेठ ढोबळे काळूरामशेठ लोखंडे, मा. सरपंच बबनराव ढोबळे, सहाने मॅडम, वाचनालय कर्मचारी उत्तम लबडे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.