ग्रामपंचायत पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक यांच्या माध्यमातुन १५ वित्त आयोगामार्फत जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही चे वाटप!!
ग्रामपंचायत पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक यांच्या माध्यमातुन १५ वित्त आयोगामार्फत जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्ही चे वाटप!!
ग्रामपंचायत पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव शाळेसाठी१५ वित्त आयोगाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी ४ स्मार्ट टीव्ही चे वाटप करण्यात आले.
याआधी देखील जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सीसीटीव्ही,शौचालय युनिट, संगणक युनिट, शाळेसाठी कंपाउंड गेट अशी अनेक प्रकारची कामे करण्यात आलेली आहेत.पुढे देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून शैक्षणिक निधी म्हणून चांगल्या प्रकारची कामे करण्यात येतील अशा आश्वासन पारगाव ग्रामपंचायतच्या सरपंच श्वेताताई ढोबळे यांनी दिले.
यावेळी उपसरपंच नितीन शेठ ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य किरणशेठ ढोबळे, काळूरामशेठ लोखंडे, वीरेंद्र शेठ ढोबळे, रोहिणी ताई देवडे, गीतांजलीताई लोंढे, अंकिता ताई लोखंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक शेठ चव्हाण, उपाध्यक्ष सचिन दातखिळे, शंकरशेठ देवडे, अभिमन्यू लोखंडे, रेश्माताई पाटील, अक्षदाताई लोखंडे तसेच शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.