आरोग्य व शिक्षणसामाजिक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) शाळेचे तालुकास्तरीय गायन स्पर्धेत यश!!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) शाळेचे तालुकास्तरीय गायन स्पर्धेत यश!!
आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत संपन्न झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव(शिंगवे) शाळेने गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष बजरंग देवडे, ग्रामपंचायत सदस्य काळूराम लोखंडे यांनी विजेते विद्यार्थी व शालेय प्रशासन यांचे अभिनंदन केले आहे.
मुख्याध्यापक संतोष लबडे सर, शिवाजीराव लोखंडे सर, चव्हाण सर, हिंगे सर, डुंबरे मॅडम,लोखंडे मॅडम या सर्वांचे यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.