जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी(धामणी) शाळेचे तालुकास्तरीय लेझीम स्पर्धेत विशेष प्रविण्यासह यश!!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी(धामणी) शाळेचे तालुकास्तरीय लेझीम स्पर्धेत विशेष प्रविण्यासह यश!!
पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरिय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव सन २०२४-२५ दिनांक रविवार ५,सोमवार ६ जानेवारी २०२५ रोजी लांडेवाडी येथे संपन्न झाल्या .सदर स्पर्धेत पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी या शाळेने मुलींचा लहान गट लेझीम या स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य सह प्रथम क्रमांक पटकावला आहे.टाँंफी व प्रशस्तीपत्र भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व्हा.चेअरमन प्रदीप वळसे पाटील व पंचायत समिती माजी सदस्य रविंद्र करंजखेले,पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वेळी गट शिक्षणाधिकारी उषा मसळे , विस्तार अधिकारी चिमा रामा बेंडारी , केंद्र प्रमुख भगवंत टाव्हरे उपस्थित होते.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक प्रविण पोखरकर यांचे अभिनंदन केले.मुख्याधापक अनिता भुमकर मँंडम,शिक्षक राजेंद्र ढोबळे सर , शंकर कदम सर, राजश्री मोटे मँंडम यांनी विशेष परिश्रम घेतले तर जिल्हा स्तरिय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समिती कडून शुभेच्छा देण्यात आल्या.