धामणी (ता.आंबेगाव) येथे सोमवारी १३ जानेवारी २०२५ रोजी खंडोबा म्हाळसा शाही विवाह सोहळा!!
धामणी (ता.आंबेगाव) येथे सोमवारी १३ जानेवारी २०२५ रोजी खंडोबा म्हाळसा शाही विवाह सोहळा!!
धामणी (ता.आंबेगाव) येथील पुरातन श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात पौष शुक्ल पक्ष पौष पौर्णिमा सोमवारी दि.१३ जानेवारी २०२५ रोजी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून वर्हाडी मंडळीच्या उपस्थितीत सांयकाळी पाच वाजता श्री खंडोबा आणि म्हाळसाचा शाही विवाहसोहळा होणार असल्याचे धामणी ग्रामस्थांनी व देवस्थानाच्या सेवेकर्यांनी सांगितले.
महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यांमधील असंख्य कुळाचे खंडोबा हे कुलदैवत आहे.खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो.जेजूरीच्या या खंडेरायाला मल्हारी मार्तंड,म्हाळसाकांत,मल्हारी अशा अनेक नावाने गौरविले गेलेले आहे.खंडोबाच्या पत्नीचे नाव म्हाळसा!!ती तिम्मशेठ वाण्याची कन्या!!तिम्मशेठला स्वप्नात भगवान विष्णूचा दृष्टांन्त झाला आणि त्यानुसार स्वप्नपूर्ती करण्यासाठी तिम्मशेठनी आपली कन्या म्हाळसाचा विवाह खंडोबाशी करुन दिला. हा शाही विवाह सोहळा पौंष पौर्णिमेला संपन्न झाला.म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांची ही विवाहाची तिथी मानली जाते.
पौष महिण्यात विवाह किंवा कोणतेही शुभकार्य केले जात नाही.कारण या महिन्यातील पुष्य नक्षत्र हे विरक्ति देणारे असल्याचे मानण्यात येते. अशा नक्षत्रात लग्न केले तर संसारात विरक्ति येऊन कसे चालेल ? तरीदेखील शिवपार्वतीचे अवतार असलेले खंडोबा आणि म्हाळसा यांनी पौंष पौर्णिमा ही विवाह तिथी निवडली.कारण शिवशंकर हे स्वत: मदनारी म्हणजे मदनाचा नाश करणारे व त्यांच्यावर विजय मिळवणारे आणि पार्वती ही जगतसुंदरी असल्यामुळे त्यांच्या संसाराला या नक्षत्राची बाधा आली नाही.उलट हा विवाहसोहळा निविघ्नपणे पौष पौर्णिंमेला संपन्न झाला.
या विवाह दिनाची आठवण जागवणारा सोहळा सणासारखा साजरा होतो.हा एक लोकोत्सव आहे.पिढी दरपिढी चालत आलेल्या रितीरिवाजाप्रमाणे तो लग्न सोहळा पाल (ता. कराड,सातारा) व ठिकठिकाणच्या खंडोबा देवस्थान मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
आपल्या लोकसंस्कृतीचा जवळून परिचय व्हावा म्हणून प्रत्येकाने एकदा तरी या पौष पौर्णिमेच्या खंडोबा म्हाळसा यांच्या पवित्र विवाह सोहळ्यास उपस्थित राहून हे देवकार्य बघावे असा हा विलोभनीय क्षण असतो.
सदानंदाचा येळकोट व येळकोट येळकोट जयमल्हार म्हणत लाखो भाविकांच्या उपस्थितीत दरवर्षी पौष शुध्द पौर्णिमेला पुरातन काळापासून लोकोत्सव साजरा करण्यात येतो असे वेदाचार्य वामन बाळकृष्ण मरकळे गुरुजी (आळंदीकर) यांनी सांगितले.
प्रथेनुसार धामणी येथील खंडोबा मंदिरात पहाटे पाच वाजता स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक व महाआरती झाल्यानंतर खंडोबाच्या हळदीचा सोहळ्यात सप्तशिवलिंगाला सुवासिक चंदन व हळदीचा लेप देण्यात येतो.दुपारी तीन वाजता गावातील पेठेतून खंडोबा व म्हाळसाचे सर्वांगसुंदर मुखवटे फुलाने सजवलेल्या पालखीतून पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत विवाहासाठी येथील मुख्य खंडोबाचे देवस्थान मंदिरात आणले जातात.यानंतर मंदिरातील विवाहमंडपात मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून वर्हाडी भाविक मंडळीच्या उपस्थितीत सांयकाळी पाच वाजता खंडोबा म्हाळसेचा विवाह सोहळा होणार असल्याचे ग्रामस्थ व सेवेकर्यांनी सांगितले .