आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण माध्य.विद्यालयात शालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न!!
आंबेगाव वसाहत येथे शालेय क्रीडा महोत्सव संपन्न!!
प्रतिनिधी -समीर गोरडे
यशवंतराव चव्हाण माध्य.विद्यालयात शालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न!!
शैक्षणिक वर्ष २०२४/२५ मधील नववर्षाचे औचित्य साधत विद्यालयात आंतर शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न आंबेगाव वसाहतच्या सरपंच प्रमिलाताई घोलप याच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रकाश घोलप (सभापती कृ.उ. बा. समिती मंचर), विजय घोलप,मिलिंद भांगरे(ग्रामपंचायत सदस्य )ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी.डी.चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन वळसे सर यांनी केले.उपस्थित मान्यवरांचे सत्कार व स्वागत पी.डी.चव्हाण यांनी केले.
आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत ५वी ते१०च्या मुला मुलींनी उस्फुर्त सहभाग घेतला. यामध्ये कबड्डी,खो- खो,क्रिकेट तसेच वैयक्तिक खेळांचा समावेश होता.
या स्पर्धेचे नियोजन माणिक हुले, वैशाली काळे,संजय वळसे,लक्ष्मी वाघ, वैभव गायकवाड,राजन राक्षे,गौरी विसावे,रुपाली बटवाल,संतोष पिंगळे, सुभाष साबळे,गुलाब बांगर,लक्ष्मण फलके यांनी पाहिले..