जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे बालिकादिन उत्साहात साजरा!!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे बालिकादिन उत्साहात साजरा!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालिका दिन अर्थात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.या निमित्ताने बालिका दिनाचे आयोजन व त्या निमित्ताने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी या ठिकाणी बालसभेचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली.प्रतिमापूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मानसी विशाल ढोबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका वैजयंता विजय थोरात, अंगणवाडी ढोबळेवाडी सौ.लताश्री अण्णासाहेब लबडे अंगणवाडी सेविका तसेच सौ. निर्मला देवीदास पाचपुते अंगणवाडी मदतनीस या महिलांनी केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता चौथीच्या समर्थ सुभाष दौंडकर याने केले. प्रास्ताविकामध्ये इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी वैष्णवी रोहिदास ढोबळे हिने,इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी मानसी विशाल ढोबळेची अध्यक्षस्थानी निवड केली तर दुसरी च्या आराध्या दीपक ढोबळे हिने सदरच्या अध्यक्ष स्थानासाठी सर्वांच्या वतीने अनुमोदन दिले.सृजन चंद्रकांत वनवे, अन्वय नितीन ढोबळे, स्वराज सतीश ढोबळे,आयांश मच्छिंद्र वनवे, विश्वजीत शामकांत ढोबळे, स्वरा नामदेव वनवे,आराध्या दिपक ढोबळे, वैष्णवी रोहिदास ढोबळे,आराध्या नामदेव वनवे, आरुष विलास ढोबळे,समर्थ सुभाष दौंडकर, रूतिका गणेश थोरात, दुर्गा संदीप आगोसे व अनुष्का कैलास ढोबळे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
सर्वांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ.वैजयंता विजय थोरात यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष व मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मानसी विशाल ढोबळे हिच्या भाषणाने बालसभेची सांगता झाली.