समर्थ शैक्षणिक संकुलात ४४ माजी सैनिकांचा सन्मानसोहळा !!


पंचांना बेल्हे प्रतिनिधी – समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे “सन्मान माजी सैनिकांचा भारतमातेच्या वीर सुपुत्रांचा” या कार्यक्रमांतर्गत माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
समर्थ संकुलामध्ये ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून ऑपरेशन सिंदूर या विषयावर नाट्य सादरीकरण केले. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.हर घर झेंडा या उपक्रमा अंतर्गत ४४ माजी सैनिकांचा सन्मान सोहळा संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत तिरंगा रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये संकुलातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माजी सैनिकांबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून व आदराप्रति दरवर्षी समर्थ संकुलात या स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
अभूतपूर्व साहस,जाज्ज्वल्य देशाभिमान,दुर्दम्य इच्छाशक्ती,नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा,प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान देशाची खरी संपत्ती असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.
आपल्या तिरंग्याची आण,बाण शान ही आताच्या तरुणांच्या हातात आहे.त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन माजी सैनिक कॅप्टन गोपीनाथ कसाळ यांनी केले.
आपण प्रत्येक जण सैनिक होऊ शकत नाही पण ज्या क्षेत्रात जाल त्या ठिकाणी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडून नियमांचे पालन करणे ही देखील एक देशसेवाच असल्याचे यावेळी सुभेदार मेजर उमेश अवचट यांनी सांगितले. तसेच इंजीनियरिंग आणि पॉलिटेक्निक केल्यानंतर सैन्य दलामध्ये असलेल्या नोकरीच्या विविध संधी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
समर्थ शैक्षणिक संस्थेने माजी सैनिकांप्रतीचा दाखवलेला सद्भाव म्हणजेच देशाप्रतीचाच सद्भाव असल्याचे यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष डी के भुजबळ म्हणाले.कॅप्टन महादेव हाडवळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,जुन्नर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष डि.के.भुजबळ,उपाध्यक्ष दिलीप आरोटे,गोपीनाथ कसाळ,शिवनेरी माजी सैनिक संघटना अध्यक्ष एकनाथ वाजगे,कार्याध्यक्ष उमेश अवचट,चंद्रकांत जाधव,गोपीनाथ कुटे,बाळासाहेब मुळे,संजय शेटे,दामोदर घोलप,डी आर थोरवे,संतोष घोडके,सतीश भुजबळ,सुनील गाडगे, कॅप्टन महादेव हाडवळे,शिवाजी पाटील,चंद्रकांत मवाळ,दत्तात्रय आरोटे,मार्तंड घोलप,संजय सोनवणे,नवनाथ गाढवे,विजय सहाने,गोरक्षनाथ मडके,मिस्तरी सलीम इनुस,धोंडीभाऊ कुंजीर,कैलास कबाडी,सुभाष काकडे,निवृत्ती तांबे,एकनाथ वाजगे,उमेश वऱ्हाडी,सुभाष भोर,सचिन दाते,संभाजी वाळुंज,मोहन बनसोडे,अमरनाथ खोकराळे,साईनाथ झिंजाड,पंढरीनाथ घेटकर,भास्कर डोंगरे,संतोष पोखरकर,दत्तात्रय सोमवंशी,संतोष माळवे,विरमाता चंद्रकला जाधव,शिवाजी पाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी सैनिकांचे चित्तथरारक अनुभव ऐकताना सर्वांच्या अंगावर शहारे उमटत होते.उपस्थित सर्व माजी सैनिकांचा संस्थेच्या वतीने शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी,प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तर आभार क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी मानले.