वन विभाग श्रीगोंदा आणि इको रेस्क्यू दौंड,रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वन्य जीव सप्ताह उत्साहात संपन्न!!


पंचनामा श्रीगोंदा प्रतिनिधी – वन्य जीव सप्ताह निमित्त वन विभाग श्रीगोंदा आणि इको रेस्क्यू दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा, महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्था श्रीगोंदा, तसेच श्री छत्रपती विद्यालय बेलवंडी, जिल्हा परिषद शाळा वेठेकर वाडी श्रीगोंदा, मिरजगाव रेंज मधील कौडाणे अशा विविध ठिकाणी वन्यप्राणी छायाचित्र तसेच जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास ४५०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दाखवली.

या कार्यक्रमाची मुख्य उपस्थिती मा. श्री.संदीप गवारे (Dfo पुणे वन्यजीव), मा. श्री. किशोर येळे (Acf पुणे वन्यजीव), मा.श्री.संकेत उगले (Rfo मिरजगाव), सौ दिपाली भगत (Rfo श्रीगोंदा), मा. श्री. युवराज पाचरणे (Rfo श्रीगोंदा वन्यजीव) आणि सर्व वन कर्मचारी उपस्थित होते.

वन्यजीव सप्ताहातील कार्यक्रमाची सुरुवात ही आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयातून करण्यात आली. येथे प्रमुख उपस्थिती मा.श्री.प्रदीप दादा वळसे पाटील (व्हा. चेअरमन भीमाशंकर स. का. ली.), मा. श्री. प्रशांत खाडे (उपवनसंरक्षक जुन्नर), मा. श्री. अमृत शिंदे (सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर), सौ. स्मिता राजहंस (सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर), तसेच वन कर्मचारी, बिबट शीघ्र कृती दलातील सभासद उपस्थित होते.

हे कार्यक्रम वनविभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या माध्यमातून इको रेस्क्यू दौंड या संस्थेच्या मार्फत घेण्यात आला. इको रेस्क्यू दौंड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.नचिकेत अवधानी यांनी मुलांना निसर्गातील विविध जंगली प्राणी, सर्प, पक्षी यांच्यासोबतच सहजीवन कसं जगावं, जंगली प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजनांचा अवलंब करावा तसेच वन्यप्राणी जखमी अवस्थेत सापडले तर त्या संदर्भात वनविभाग किंवा वन्यप्राणी बचाव पथकाला कसे कळवावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी काढलेले दौंड आणि दौंड परिसरातील वन्यप्राणी,पक्षी, कीटक, सरडे, बेडूक, साप यांचे छायाचित्र आणि त्याची माहिती मुलांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली.

तसेच इको संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. गायत्री अवधानी, बाकी सभासद श्री. दत्तात्रय राजगुरव, शारदा राजगुरव, अक्षय बोराटे, श्रेयस कांबळे, मोनिका बोराटे, अभिलाष बनसोडे, अभिजीत धोत्रे, वेदांत बहिरट हे उपस्थित होते.


