गांधी नेपाळ फाऊंडेशन यांच्या वतीने अभिलाषा मोढवे यांना मानद डॉक्टर पदवी पुरस्कार प्रदान !!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – समीर गोरडे
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील वेलकिन इंडिया या संस्थेच्या अध्यक्षा कुमारी अभिलाषा मोढवे यांना वयाच्या विसाव्या वर्षी गांधी फाऊंडेशन नेपाळ यांच्या वतीने मानद डॉक्टर पदवी पुरस्कार पुणे येथील पत्रकार भवन येथे बहाल करण्यात आला.

यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख डॉ.दिपक जाधव,डॉक्टर मनोज तळेकर, वाळुंजवाडीचे सरपंच नवनाथ वाळुंज, मा.उपसरपंच मयूर गायकवाड,स्वयंभू मोरया मोटर्सचे सर्वेसर्वा अध्यक्ष भीमराव वाळुंज,msf अधिकारी सुरेंद्र कालेकर,प्राचार्या भांगरे मॅडम,मा. दीपकशेठ बोराडे,उद्योजक अजितदादा रिठे,अक्षय रिठे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी देण्यात आली.

यावेळी अभिलाषा मोढवे मनोगत व्यक्त करत असताना सांगितले कि ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रकारचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करून साधारण पाच वर्षांत तीन हजार महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले असुन ग्रामीण भागातील महिला स्वःताच्या पायावर उभ्या असुन स्वतःचा व्यवसाय करत आहेत.या कामामध्ये आई मिनल मोढवे यांचीही मोलाची साथ मिळाली. डॉक्टरेट पदवी प्राप्त करणारी तसेच कमी वयात येवढे योगदान असणारी पहिलीच व्यक्ती असल्याने मंचर पंचक्रोशीत अभिलाषा मोढवे यांचे कौतुक होतांना पहायला मिळत आहे.

