ग्रामपंचायत जवळे (ता.आंबेगाव) येथे विविध शासकीय योजनांचा मेळावा संपन्न!!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड,आभा कार्ड, आधारला मोबाईल नंबर लिंक करणे, फार्मर आयडी काढणे, लाडकी बहीण योजनेची kyc करणे तसेच इतर ऑनलाईन सुविधा बाबत कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
या कॅम्पच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड ,आभा कार्ड ९५ टक्के काम पूर्ण झालेले असून गावांमधील फक्त ४६ ग्रामस्थांचे आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड बाकी आहे अशी माहिती जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे यांनी दिली.

यावेळी उपसरपंच मनीषा टाव्हरे, चंद्रकला गायकवाड, शुभांगी खालकर, संगीता साबळे, हरिचंद्र शिंदे , अमोल वाळुंज,प्रमिला गावडे,आशा वर्कर सुनंदा शिंदे, अंगणवाडी सेविका शालन सोनवणे, संगीता वाळुंज, जयश्री शिंदे,शशिकला गावडे,गरुड कॉम्प्युटर सर्विसेस सुरज गरुड ,अंकुश गायकवाड ,दत्तात्रय लायगुडे मच्छिंद्र लायगुडे महेश लायगुडे उषा पोखरकर सुंदर लायगुडे यांचा मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होते अशी माहिती गावच्या सरपंच वृषाली शिंदे पाटील यांनी दिली.

