ग्रामपंचायत जवळे,पद्मश्री डॉ.मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन,मोहन ठुसे नेत्र रुग्णालय नारायणगाव यांच्या माध्यमातून नेत्र तपासणी मोतीबिंदू शिबिर संपन्न!!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जवळे गावात ग्रामपंचायत जवळे यांच्या माध्यमातून व पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन ,मोहन ठुसे नेत्र रुग्णालय नारायणगाव यांच्या वतीने नेत्र तपासणी मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन आदर्श सरपंच वृषालीताई उत्तम शिंदे पाटील व उपसरपंच मनीषा टाव्हरे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी चंद्रकला गायकवाड, दत्तात्रय लायगुडे, संगीता साबळे, शुभांगी खालकर, ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे, आशा वर्कर सुंनदा शिंदे,एकनाथ शिंदे, पोपट शिंदे, बबन लोखंडे, अंकुश गायकवाड, अशोक ताजने,ज्ञानदेव वाळुंज, शरद खालकर ,तुषार टाव्हरे, पंढरीनाथ टाव्हरे , बाळासाहेब बोराटे ,अशोक शिंदे, शंकर शिंदे, लक्ष्मण शिंदे,राम खालकर , महादेव शिंदे, ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील खालकर, विजय शिंदे,अशोक लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

शिबिरामध्ये एकूण ९७ ग्रामस्थांचे डोळ्यांची तज्ञ डॉक्टर व डॉ, सौ दीप्ती ठोकळ नेत्र सहायक, यांनी तपासणी केली रवींद्र कानडे संपर्क अधिकारी,यांनी यातून १० रुग्ण मोतीबिंदू ऑपरेशन साठी नारायणगाव या ठिकाणी पाठवण्यात आले अशी माहिती मा.पोलीस पाटील उत्तम शिंदे यांनी दिली.


