आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रूक येथे छकडी बैलगाडी शर्यतींचे मैदान झाले संपन्न!!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी- आंबेगाव तालुक्यात प्रथमच तीन फेऱ्यांच्या बैलगाडी शर्यतींचे मैदान पार पडले.पिरसाहेब यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक केसरी या मानाचे स्पर्धेचे नियोजन पार पडले. यावेळी महाराष्ट्रातील अनेक नामवंत बैल व गाडामालक लांबून लांबून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते.
काठापुर बुद्रुक येथील पिरसाहेब यात्रा उत्सवा निमित्त आंबेगाव तालुक्यात प्रथम तिन फेऱ्यांचे बैलगाडी मैदान आयोजित केले होते. तसे पाहिले तर उत्तर पुणे जिल्ह्यात चार बैली बैलगाड्यांचे घाट पार पडत असतात. परंतु यावेळी प्रथमच बैलगाडी छकडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला एकूण 450 बैलगाडा मालकांनी भाग घेतला. या स्पर्धेसाठी जळगाव ,मनमाड ,येवला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ,अहिल्यानगर, सातारा ,फलटण, कल्याण, अंबरनाथ,ठाणे, रायगड, पनवेल, पुणे, श्रीगोंदा अशा ठिकाणावरून लांबून लांबून बैलगाडी मालक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख 21 हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले होते.यावेळी प्रथम क्रमांक सुधीर खांडेभराड बाळु पोटे नाशिक (शार्दुल ग्रुप यांचा राजा व बाजी) दुसरा क्रमांक -साहिल प्रतिष्ठान कल्याण व पांडुरंग काळे यांच (हारण्या आणि जलवा),तिसरा क्रमांक-पप्पु खांडेभराड शाकिर पठाण छत्रपती संभाजीनगर व संतोष तोडकर ठाणे यांचा (साई 1111 आणि वजीर),चौथा क्रमांक-वनिता धनवडे यांचा (वडकीचा पिस्टन 2211 आणि गिरवीचा रुद्रा),पाचवा क्रमांक- सुनिल पोखरकर हनुमंत जाधव यांचा (लखन 1197 आणि कबीरा),सहावा क्रमांक इंदलकरांचा सुंदर आणि गरुड गृपचा सुंदर,सातवा क्रमांक-संतोष जाधव घोटचा सर्जा 2526 आणि वाटेगावकरांचा बादल,आठवा क्रमांक वैभव टेमकर रामदास कराळे यांचा सुंदर & मुरल्या या बैलांनी क्रमांक पटकाविला पटकावला.

या बैलगाडा मालकांनी मिळवला यात्रेचे नियोजन सुनील पोखरकर,हनुमंत जाधव,कमलेश ढोरे,किरण करंडे,अध्यक्ष तानाजी जाधव,सुदर्शन करंडे,निवृत्ती करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे, सुभाष जाधव,विठ्ठल टिंगरे,बबन जाधव,बाळासो नरे,नरहरी करंडे, बजरंग करंडे, रामदास करंडे, एकनाथ ढमाले,तन्मय पाटील तरुण मंडळी यांसह ग्रामस्थांनी नियोजन पाहीले.तालुक्यात प्रथमच बैलगाडी छकडी स्पर्धां होत असल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
यावेळी मा.खासदार, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार कार्याध्यक्ष देवदत्त निकम,मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अरुण गिरे,जयसिंग एरंडे,पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले,अनिल वाळुंज, नगरसेवक सागर गवळी, काकासाहेब गवळी,माळशिरस चे नगराध्यक्ष सचिन वावरे,रामकृष्ण टाकळकर, आंबेगाव तालुका बैलगाडा संघटना अध्यक्ष शिवाजी निघोट,वैभव उंडे,सुहास बाणखेले, पारगावच्या सरपंच श्वेता ढोबळे यांसह अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला हजेरी लावली.
यावेळी निकाली पंच किरण गारगोटे, निलेश कबाडी,किरण जाधव,झेंडा पंच बापु धनवडे,आनंद जगदाळे,नंबर टेकर सुनिल झांबरे, निवेदन सुनिल मोरे, विकास जगदाळे, मयुर तळेकर,रनजित बनसोडे यांनी काम पाहीले.