क्रांती दिनाच्या निमित्ताने मंचर (ता.आंबेगाव) येथील आवटे महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन !!


पंचनामा मंचर प्रतिनिधी – मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात इतिहास विभाग अंतर्गत क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस गायकवाड यांनी भूषविले.या कार्यक्रमास व्याख्याते म्हणून बी. डी. काळे महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉ. चांगुणा कदम उपस्थित होत्या.

क्रांती दिनाचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे स्थान, तसेच चले जाव चळवळीचे महत्व डॉ.चांगुणा कदम यांनी सांगितले.चळवळीतील महत्वाच्या प्रसंगावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. एन.एस. गायकवाड यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी दिलेले बलिदान याबद्दल माहिती दिली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस. बी.सालके यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधित करताना सांगितले,विद्यार्थ्यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास करून इतिहासातून नवनवीन तथ्य समाजापर्यंत पोहोचवावेत.
सदर कार्यक्रमास डॉ. इ. ए. शेख, प्रा. व्हि.आर.मींडे,प्रा. ए. एस. पारधी, डॉ.एस. एस. उघडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रविंद्र पारधी यांनी केले.तर पाहुण्यांची ओळख प्रा. राहुल सरोदे यांनी करून दिली. प्रा.हेमांगी गावित यांनी आभार मानले. तर सूत्रसंचालन कु.आशिष वागळे विद्यार्थ्याने केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.