शिंगवे(ता.आंबेगाव) येथे संपन्न झाले डिजीटल ग्रामपंचायतचे उद्घाघाटन !!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – समीर गोरडे
आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत शिंगवे येथे महिला सभा व डीजीटल ग्रामपंचायतचे उद्घाघाटन सरपंच सिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती विस्तार अधिकारी आंबेगाव रंगनाथ हुजरे यांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी आदर्श राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,भारत रत्न मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत,सन्मान करून, ग्रामपंचायतीने दिलेल्या युवती व महिला व्यवसाय प्रशिक्षणातून महिला चांगल्या अर्थार्जन करून गावाच्या विकासात भर टाकत असून, ग्रामपंचायतीच्या आव्हानास मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होवून प्रतिसाद दिला.

त्यानंतर रंगनाथ हुजरे साहेबांच्या हस्ते डिजिटल ग्रामपंचायतीचे उद्घाटन करण्यात आले, तसेच दिव्यांग बंधू भगिनींचा पूर्ण निधी वाटप करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत शिंगवे येथील सर्व ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने डिजिटल ग्रामपंचायत करण्याचा निर्णय घेतल्याने, ग्रामपंचायत कडुन ग्रामस्थांना चांगल्या सेवा देवून उत्पन्नात वाढ होईल, नवनवीन सुधारणा होण्यास मदत होईल. तसेच मा.गजानन पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी) जिल्हा परिषद पुणे यांच्या संकल्पनेतून, पंचायत समिती आंबेगाव गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांच्या आदेशान्वये ते पुढे एकल महिलांच्या बाबतीत माहिती देवून मार्गदर्शन करताना बोलत होते कि, ग्रामस्थांनी समाज्यातील वाईट चाली-रिती, व परंपरा बंद करून एकल महिलांचा मान सन्मान राखून, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देवून आर्थिक बळ दिले पाहिजे, त्यानंतर उपस्थित एकल महिलांचा सन्मान व प्रतिज्ञा घेतली आणि अनिष्ठ प्रथा निर्मुलानाबाबातचा ठराव केला.

त्यानंतर शिवव्याख्याते अर्चना भोर-करंडे, यांनी इतिहासातील मर्दानी स्त्रियांचे कर्तुत्व, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि आजच्या स्त्रियां या विषयावर पुरोगामी परिवर्तनवादी व्याख्यान दिले.

यावेळी सरपंच सिता पवार, उपसरपंच हिरामण गोरडे, ग्रामपंचायत सदस्य सोपान पाबळे, नाविनाताई गाढवे, शांताबाई वाव्हळ, पोलीस पाटील गणेश पंडित, ग्रामविकास अधिकारी तुकाराम मोरे,सर्व आशा वर्कर,सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, सी.आर.पी, आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थीत होते..
