जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडाळे (ता.आंबेगाव) येथे विविध उपक्रमांनी साजरा झाला स्वातंत्र्यदिन !!


पंचनामा भीमाशंकर प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७९ वा स्वातंत्र्यदिन प्रभातफेरी,ध्वजपूजन, ध्वजारोहण,विद्यार्थी भाषणे व शैक्षणिक साहित्य वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ‘बेटी बचाव,बेटी पढाव’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय जवान,जय किसान’, ‘स्वातंत्र्य दिनाचा विजय असो’, ‘भारत अमुचा प्राण,तिरंगा त्याची शान’ आदी संदेश फलक हातात घेऊन प्रभातफेरी काढली.ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्या सुरेखा लोहकरे,अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे,ग्रामसेवक हनुमंत तारडे यांनी ध्वजपूजन व सरपंच सविता कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी लोहकरे,शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक के.के.लोहकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत गायनाने झाली.यावेळी कृषी विभाग वरिष्ठ लिपिक चिंतामण गेंगजे,काळू कुऱ्हाडे,नामदेव गेंगजे,पांडुरंग कुऱ्हाडे,मुख्याध्यापिका शोभा जाधव,शिक्षक संतोष थोरात,लिलाबाई लोहकरे,लक्ष्मण पोखरकर,संतोष भोर,योगिता भोमाळे,अक्षय कुऱ्हाडे,सुनिल कुऱ्हाडे,स्वप्नील अस्वले,अंकुश लोहकरे उपस्थित होते.शूर वीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या आठवणींना विद्यार्थी आर्या कुऱ्हाडे,स्वरा शेळके,अनुजा भोमाळे,सिया पवार,प्रणव लोहकरे,श्रुती भोमाळे,अक्षदा तिटकारे यांनी भाषणातून उजाळा दिला.

सामाजिक कार्यकर्ते विनायक लोहकरे यांनी आपली मुलगी चार्वी हिच्या वाढदिवसानिमित्त ड्राईंग कीट,घोडेगाव येथील प्राध्यापक कै.सतीश रामचंद्र भंडारे यांच्या स्मरणार्थ ओम भंडारे यांजकडून लेखन साहित्य पॅड,शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांजकडून वह्या आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.मारुती लोहकरे,सुरेखा लोहकरे यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष थोरात यांनी मानले.खाऊ वाटप व पसायदान गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

निगडाळे (ता.आंबेगाव) येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी तिरंगा राष्ट्रध्वजासह सामाजिक संदेश फलक हातात घेऊन प्रभातफेरी काढली.

निगडाळे(ता.आंबेगाव) येथील शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक के.के.लोहकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

