जवळे (ता.आंबेगाव) येथे घरगुती सिलेंडर मधून गॅस गळतीमुळे घराला लागली आग,सुदैवाने जीवितहानी नाही !!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील जवळे गावठाण या ठिकाणी भरत कृष्णा गावडे यांच्या राहत्या घरी रात्री आठ वाजता स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची गळती होऊन भीषण आग लागली होती.यामध्ये त्यांच्या घरातील जीवनावश्यक सर्व वस्तू,संसार उपयोगी वस्तू यांचे पूर्णतः नुकसान झाले असून घराला भीषण आग लागल्याने सर्व जळून खाक झाले आहे.

यावेळी गावातील सर्व तरुण वर्गाने आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.वीज प्रवाह बंद करून पाण्याच्या साह्याने आग आटोक्यात आणली.

घटनास्थळी गावचे सरपंच सौ.वृषाली शिंदे पाटील,पारगाव स्टेशनचे साहेब, पोलिस पाटील, सोसायटीचे चेअरमन,संचालक, उपसरपंच, सदस्य, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.

सरपंच यांनी मा.तहसीलदार संजय नागटिळक साहेब यांच्याशी फोनवरून संपर्क साधून सर्व माहिती दिली.साहेबांनी आपल्या स्तरावरून तात्काळ पंचनामा करण्याचे तलाठी यांना सांगितले.त्याचप्रमाणे अष्टविनायक गॅस एजन्सी नारायणगाव या ठिकाणाहून गॅस सिलेंडरची गळती कशामुळे झाली हे पाहण्यासाठी अधिकारी आले होते.

अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे गावडे सांगितले.या वेळी पत्रकार वळसे यांनी भेट दिली अशी माहिती ग्रामविकास अधिकारी शीला साबळे यांनी दिली.