पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाला स्वातंत्रदिन !!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कलागुण सादर करून सर्व ग्रामस्थांना प्रेरित केलं. विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला.

यावेळी पारगाव चे भूमिपुत्र पुण्यासारख्या शहरात बांधकाम व्यवसायात नाव कमावलेले बढेकर डेव्हलपर्स सर्वेसर्वा दानशूर व्यक्तिमत्वम श्री.केशव नाना बढेकर यांच्या माध्यमातून मुक्त देवी पायी दिंडी पारगाव सोहळ्याच्या आळंदी येथील धर्म शाळेसाठी साडेतीन लाख रुपये ,व संगमेश्वर विद्यालयासाठी तीन वर्ग खोल्या,आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी कमान बांधून देण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बढेकर डेव्हलपर्स सर्वेसर्वा केशव नाना बढेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक शालेय व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक ,सर्व उपस्थित होते….



