जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने 255 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप!!


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने स्वतंत्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी च्या पहिली ते सातवी पर्यंतच्या 255 विद्यार्थ्यांना संस्थेच्या स्वतःच्या स्वनिधीमधुन स्कूल बॅगचे वाटप केले आहे.अशी माहिती संस्थेचे सचिव नवनाथ मंचरे यांनी पंचनामाशी बोलताना दिली.
यावेळी संस्थेचे चेअरमन खंडूशेठ भोजने,व्हाईस चेअरमन बाळासाहेब लबडे,सरपंच प्रतिक्षाताई बढेकर, सभेचे अध्यक्ष आण्णासाहेब लबडे,उपसरपंच सचिन टाव्हरे,उद्योजक रामहरी देव्हडे,शरद पतसंस्थेचे संचालक रवींद्र काकडे,मा.उपसरपंच कौशल्याताई भोजने,संचालक सुभाष भोजने, मा.व्हाइस चेअरमन दत्ता लोले,संदिप वैद्य,केंद्र प्रमुख मच्छिंद्र काळे सर,सौ. वाघमारे मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते.