काळभैरवनाथ सौ,लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालयात शालांतर्गत क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न !!

काळभैरवनाथ सौ,लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालयात शालांतर्गत क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न !!
प्रतिनिधी – समीर गोरडे
खडकी येथील काळभैरवनाथ सौ. लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालयात शालांतर्गत क्रीडा महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला.यामध्ये विद्यालयात कबड्डी,खो-खो या खेळांबरोबरच विविध फनी गेममध्ये ५वी ते इ.१०वीच्या २१६ विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला.
या स्पर्धेचे उद्घाटन खडकी गावचे विद्यमान सरपंच दत्तात्रय जिजाबा बांगर,मा.सरपंच कृष्णा देवराम भोर,खरेदी विक्री संघाचे माजी संचालक पांडुरंग किसन पाटील,संतोष खंडू बांगर यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीने खेळात आपापले कौशल्य दाखवावे,निकोप वातावरणात व अत्यंत उत्साहात विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उतरावे असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी केले.
तसेच विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली.सर्व स्पर्धांचे पंच म्हणून रामकृष्ण राजगुरू,प्रभाकर झावरे यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून जोत्स्ना खेडकर ,रुपाली ठाकूर,माधुरी थोरात व मंगल सोनार यांनी काम केले.
संजीव पिंगळे,धम्मपाल कांबळे, बाळासाहेब विधाटे,संतोष खालकर, रामदास लबडे,रामदास भांड,निलेश भालेराव यांनी नियोजन केले.