काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप येथे महिलांच्या हस्ते ध्वजारोहण!!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप येथे महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर,लाखनगाव, पोंदेवाडी,देवगाव, जारकरवाडी आदी गावांमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय,दुध संस्था कार्यालय, सरकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. अनेक जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये विविध संस्कृती कार्यक्रम पार पडले. देशभक्तीपर गीते,भाषणे अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अनेक विद्यार्थी व ग्रामस्थांची भाषणे ही झाली. अनेक ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची व्यवस्था करण्यात आले होती. अशा विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला.
यावेळी काठापुर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप गणेशनगर या ठिकाणी महिलांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिला अग्रेसर असून या महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने या ठिकाणी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हौसाबाई जाधव, प्रियांका जाधव, अरुणा करंडे, वर्षा जाधव,सारीका करंडे,रुपाली नर्हे,मा.उपसरपंच विशाल करंडे,अनिल जाधव, विलास जाधव,सागर जाधव,तानाजी जाधव,सचिन नर्हे,बबन जाधव,सोमनाथ जाधव,हौशीराम जाधव, विनायक जाधव मुख्याध्यापक राजु जाधव, शिक्षण ग्रामस्थ उपस्थित होते.
