स्वराज्य कलाकार महासंघाच्या वतीने कला क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कलावंतांचा मंचर येथे शनिवार दि.४ जानेवारी २०२५ रोजी सत्कार समारंभ होणार संपन्न!!
स्वराज्य कलाकार महासंघाच्या वतीने कला क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कलावंतांचा मंचर येथे शनिवार दि.४ जानेवारी २०२५ रोजी सत्कार समारंभ होणार संपन्न!!
स्वराज्य कलाकार महासंघाच्या वतीने कला क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कलावंतांचा सत्कार समारंभ शनिवार दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी शरदचंद्र पवार सभागृह मंचर या ठिकाणी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास करंडे यांनी दिली.
स्वराज्य कलाकार महासंघाच्या वतीने ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. कलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जातो. या वर्षी ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी त्यांच्या कलेच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे पूर्वी गावोगावी सुरू असणारी नाट्य व भारुड परंपरा सध्या काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणावर बंद झाली आहे.परंतु अशाही परिस्थितीत अनेक गावांमध्ये नाट्य व भारुड मंडळांनी आपापल्या पद्धतीने ही कला जिवंत ठेवण्याचे काम करत आहेत.अशा कला जोपासणाऱ्या मंडळांचा सन्माननीय यावेळी करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष हुसेन शेख यांनी सांगितले.