युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी ज्ञानेश कपिले !!


पंचनामा अहिल्यानगर (प्रतिनिधी ): शिवसैनिक ज्ञानेश वसंतराव कपिले यांची युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शुभम वाघ यांनी युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खा. सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली.

कपिले हे सध्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कोपरगाव तालुका प्रमुख असून त्यांनी याद्वारे अनेक गरजू रुग्णांना शासनाकडून मदतीचा हात दिला आहे. याच कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली. माजी खा. सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख नितीन औताडे, शहर प्रमुख अक्षय जाधव, युवा सेना,शहरप्रमुख सनी गायकवाड, सुनील साळुंखे, मनील नरोडे आदी शिवसैनिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. कपिले यांनी बोलताना सांगितले की, सामाजिक जीवनात काम करत असताना मिळालेले कोणतेही पद प्रतिष्ठेपेक्षा जास्त जबाबदारी वाढवते. शिवसेना हा केवळ पक्ष नसून एक परिवार आहे. त्यामुळे पक्षाचे ध्येय धोरणे, विचारधारा तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाजभिमुख केलेले कार्य, माजी खा. सदाशिव लोखंडे, जिल्हा प्रमुख नितीन औताडे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ आदी वरीष्ठ नेत्यांच्या मार्गदशनाखाली पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करेल.
