जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) च्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुनील चांगन तर उपाध्यक्षपदी ज्योती बारगळ, विशाल लोखंडे!!


आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव शिंगवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील चांगन तर उपाध्यक्षपदी ज्योती बारगळ व विशाल लोखंडे यांची निवड झाली आहे.

यावेळी शाळेची गुणवत्ता व भौतिक परिसर विकास करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन नवनियुक्त अध्यक्ष सुनील चांगण यांनी दिले.यावेळी सरपंच श्वेता ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे ,किरण ढोबळे, काळूराम लोखंडे ,वीरेंद्र ढोबळे, मा.सरपंच बबनराव ढोबळे, भागचंद पोंदे,कांताराम दातखिळे, बजरंग देवडे ,निवृत्ती ढोबळे, सोनबा ढोबळे ,अनिल ढोबळे ,लक्ष्मण ढोबळे, श्याम बारगळ,सूर्यकांत बॉम्बे, गोकुळ देवडे, विशाल लोंढे, शंकर देवडे,विवेक चव्हाण,संदीप दातखिळे, पोपट लबडे,सुरज ढोबळे, प्रशांत पोंदे ,नितीन ढोबळे, सोमनाथ पोंदे, विशाल लोखंडे, बाबाजी पुंडे,अनिल शेवाळे, लक्ष्मण ढोबळे ग्रामस्थ पदाधिकारी, शिक्षक वृंद उपस्थित होते अशी माहिती मुख्याध्यापक संतोष लबडे सर यांनी दिली.
