आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी!!
आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी!!
आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या निमित्ताने ह.भ.प.तान्हाजी महाराज तांबे,शिरदाळे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.श्री.रंगदास स्वामी महाराज यांची आरती दुपारी १२.१५ मिनिटांनी संपन्न झाली.तदनंतर आमटी भाकरीचा महाप्रसाद भरत कोल्हे आणि वैशाली कोल्हे हे दोन्ही पती पत्नी गेली २२ वर्षांपासून आपला व्यवसाय सांभाळून दान करत आहेत.या वेळी परीसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहत असतात आणि आमटी भाकरीचा ताव मारत असतात.
यावेळी किरणताई वळसे पाटील (अनुसया महिला उन्नती केंद्र संस्थापक,अध्यक्षा) शरद सहकारी बँकचे संचालक दौलत लोखंडे,अजय भिवसनकर,राजेश खडबडे,रमेश खडबडे,माजी ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री कोल्हे-लोखंडे,सुजीत लोखंडे,ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे,मानसी भास्कर कोल्हे,भागचंद पोंदे,ह.भ.प.निवृत्ती महाराज लोखंडे,बजरंग देवडे,माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे,,संतोष (सोनू)गायकवाड,सुदाम दातीर,दिलीप लोखंडे,कांताराम दातखिळे,दादाभाऊ ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.