आरोग्य व शिक्षणसामाजिक

निरगुडसर येथील पं.ज.नेहरू व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा तालुक्यात डंका!!

निरगुडसर येथील पं.ज.नेहरू व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा तालुक्यात डंका!!

पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती आंबेगाव व आंबेगाव तालुका विज्ञान-गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज मंचर (ता.आंबेगाव ) येथे ५२ वे आंबेगाव तालुका विज्ञान प्रदर्शन २०२४-२०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या प्रर्शनात (९ वी ते १२ वी ) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये निरगुडसर येथील पं.ज.नेहरू व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील वैभवी संदिप वळसे हिने प्रथम क्रमाक मिळवला व विद्यालयाची शान वाढवली.तसेच प्रश्नमंजुषा मध्ये संतोष वैष्णवी मेंगडे व आरण्या आनंदजीत पाटील ( ९ वी ते १२ वी ) या दोघींनी व्दितीय क्रमांक मिळवला तर तनया विजय वळसे व आराध्या गणेश वळसे (६ वी ते ८ वी ) या दोघींनी विज्ञान प्रकल्प-इलेक्ट्रिक टेस्टर प्रथम क्रमांक मिळविला त्यांची जिल्हा पातळीवर निवड झाली.दोहींनीही विद्यालयाची शान वाढवली.अशी माहिती प्राचार्य कांताराम टाव्हरे व पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी दिली.विशेष म्हणजे वरील सर्व प्रशस्तिपत्र विद्यार्थी व विद्यालयांच्या वतीने प्राचार्य कांताराम टाव्हरे व प्रा.अरूण गोरडे यांनी मान्यवरांच्या हस्ते स्विकारले.

वरील सर्वांना मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचे निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील, उपाध्याक्ष रामदास वळसे पाटील व संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य,पर्यवेक्षक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन केले.


निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील विद्यालयातील गुणवान यशस्वी विद्यार्थी व सोबत शिक्षक

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.