आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव पुलाचे काम कधी सुरू होणार??

आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव पुलाचे काम कधी सुरू होणार??
लाखणगाव (ता.आंबेगाव ) येथील घोडनदीवरील पुलाचे काम गेली दिड दोन वर्षे बंद असल्याने बंद पडलेले काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सुरू करावे अशी मागणी लाखणगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
घोडनदीवर जूना पूल आहे.पण त्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात घोडनदीला पूर आल्यास अनेकदा पुराचे पाणी पुलावरून जाते.व पूल पाण्याखाली गेल्याने वाहातूक मोठ्या प्रमाणात ठप्प होते.तसेच जूना पूल आरूंद असल्याने अनेखदा या पूलावर अपघात झाले आहेत.त्यामुळे या ठिकाणी जवळ जवळ दहा कोटी रुपये खर्चाच्या नवीन पूलाचे बांधकाम सुरू झाले.परंतु गेली दिड दोन वर्षापासून या पूलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. बेल्हे जेजूरी व अष्टविनायक महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने या रस्त्यावर लहान मोठ्या वाहान चालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे.नाशिक,नगर, जिल्हयातील नागरीकांना सोलपूर,सातारा,कोल्हापूर या ठिकाणी जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे.त्यामुळे वाहानांची संख्याही वाढली आहे.तसेच आंबेगाव,शिरूर,जुन्नर या तीन तालूक्यांतील अनेक गावांतील नागरिकांच्या दृष्टीने हा मार्ग जवळचा आहे.
या महामार्गाची वाहातूक सध्या जून्या पूलावरूनच सुरू आहे.जुन्या पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात घोडनदीला पूर आल्यास अनेकदा पूल पाण्याखाली जातो.व वाहातूक मोठ्या प्रमाणात ठप्प होते. सध्या या नवीन पूलाचे बांधकाम ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.परंतू पूलाच्या दोन्ही बाजूनी काम अर्धवट आहे. निधान पूढील पावसाळा सुरू होण्याअगोदर या पूलाचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी लाखणगावचे माजी सरपंच मार्तंड टाव्हरे व प्राजक्ता रोडे पाटील व निलेश रोडे, संदेश भागवत व येथील ग्रामस्थांनी केली आहे.
लाखणगाव (ता.आंबेगाव ) येथील घोडनदीवरील बंद असलेले पूलाचे काम