काळभैरवनाथ, सौ.लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन उत्साहात संपन्न!!

काळभैरवनाथ, सौ.लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन उत्साहात संपन्न!!
प्रतिनिधी -समीर गोरडे
खडकी येथील काळभैरवनाथ,सौ. लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालयात ‘क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये स्वरा थोरात हिने सावित्रीबाईंची वेशभूषा करून एकपात्री प्रयोग “मी सावित्री बोलतेय” सादर केला. तन्वी शिंदे,मधुरा अरगडे,मनस्वी पोखरकर,श्रावणी भोर,कावेरी राठोड, मेहेर शेख,यांनी प्लास्टिक प्रदूषणावर आधारित एकांकिका ‘मले बाजाराला जायचं बाई’सादर केली.
तेजस्वी पोखरकर हिने जलसंवर्धन – काळाची गरज,तन्वी बुळेने सावित्रीबाईंचा जीवन पट आपल्या भाषणातून मांडला.
प्रमुख पाहुणे आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी ‘क्रांती सूर्य ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्याला ‘भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच दत्तात्रय बांगर ,माजी सरपंच कृष्णाशेठ भोर, चेअरमन भरतशेठ पोखरकर,नवनाथशेठ वाबळे,संतोषशेठ शिरसाठ हे कार्यक्रमास उपस्थित होते .
सूत्रसंचालन मंगल सोनार यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक अविनाश ठाकुर,ज्योत्स्ना खेडकर, रामकृष्ण राजगुरू,प्रभाकर झावरे,माधुरी थोरात,रूपाली ठाकूर, संजीव पिंगळे,धम्मपाल कांबळे, बाळासाहेब विधाटे,संतोष खालकर, रामदास लबडे,रामदास भांड व निलेश भालेराव,आदी मान्यवर कार्यक्रम उपस्थित होते.तर आभार शाळेचे मुख्याध्यापक अविनाश ठाकुर यांनी मानले..