तिकीटावर तमाशाचे फड चांगले चालले पाहिजेत !!

मा.हेमंत महाजन- कलावंत,फड मालक

तिकीटावर तमाशाचे फड चांगले चालले पाहिजेत…
मा.हेमंत महाजन , कलावंत,फड मालक
दिनांक ४/५/२०२५ रोजी आनंद लोकनाट्य तमाशा मंडळास सदिच्छा भेट दिली .सदरचा कार्यक्रम आसू तालुका फलटण जिल्हा सातारा येथे यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेला होता.
याप्रसंगी फडमालक
बोलताना मा.हेमंत महाजन म्हणाले की, यावर्षी धंदे बऱ्यापैकी सगळ्यांना चांगले आहेत .
मोबाईलमध्ये जे दाखवले आहे ते तसेच दाखवावे अशी मागणी रसिक करतात .खालून अपशब्दांचा वापर करतात, नको ते हातवारे करतात.काही रसिक शांत बसत नाहीत .सतत गाणी आणि शॉर्ट कपड्यावर मुली नाचल्या पाहिजेत
यासाठी ओरड करतात.शेवटी वगनाट्याला रसिक थांबत नाहीत. कलेबद्दल रसिकांचा दृष्टीकोन खूपच बदललेला आहे .
मा.हेमत महाजन पुढे म्हणाले की,
आपल्याच गावातल्या महिला ,मुली कार्यक्रम बघण्यासाठी आल्या तरी काही रसिकांचे चालचलन बदलत नाही.काही रसिक मद्य पेऊन कसेही समोर वागतात.
यात्रा कमिटीने यांच्यामध्ये खूप मोठी महत्त्वाची भूमिका राबवली पाहिजे. जे गावातील रसिक कालवा करतात त्यांना शांत बसविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि यासाठी एक विशेष पथक नेमायला पाहिजे.
मा.हेमंत महाजन पुढे म्हणाले की,
गावात आलेल्या तमाशा फडाला मोठी मोकळी जागा दिली पाहिजे. छोट्या जागेत कार्यक्रम करता येत नाही . राहुट्या टाकता येत नाही.रसिकांना नीट बसता येत नाही . कार्यक्रम नीट पहाता येत नाही.
मा.हेमंत महाजन पुढे म्हणाले की,
काही ठिकाणी तमाशा फडाला नावे ठेऊन तमाशा फडाची बिदागी कमी केली जाते.हे योग्य नाही.रसिक तमाशा नीट बघत नाही, याचा दोष तमाशा फडाला देऊ नये.फडाच्या जीवावर अनेक लोक जगणारे असतात,फडावर कर्ज असते ,याची गावकऱ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे.
कोणत्याही परिस्थितीत फडाची बिदागी कमी करू नये.
मा.हेमंत महाजन पुढे म्हणाले की,
यात्रेचा कार्यक्रम ठरविण्यापूर्वी फडाचा कार्यक्रम जवळपास कुठे असेल तर तो पहिला पाहिजे .गावामध्ये तमाशा फडांनी कार्यक्रम केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी काढू नये. यामुळे फड मालक व कलावंताचे मन नाराज होते, आणि गावकऱ्यांचे मन नाराज होते.
मा.हेमंत महाजन पुढे म्हणाले की,
तमाशा फडाने तमाशा फड चालू होण्यापूर्वीच कलावंताचे अगोदरचे आर्थिक रेकॉर्ड तपासले पाहिजे की,पैसे घेऊन कलावंत धोका देऊ शकतो का?कलावंतानी फड मालकाचे आर्थिक रेकॉर्ड पहावे आपले सर्व पैसे मिळतील का? कलावंतानी मोठ्या मोठ्या नाईटीना भूलू नये.
फडमालक व कलावंत यांचे मध्ये आर्थिक व्यवहारामुळे बदनामी होऊ शकते.त्यामुळे प्रत्येकाने आपपापले रेकॉर्ड चेक करणे अत्यंत गरजेचे आहे .त्यामुळे एक विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.कोणाचा त्रास कोणाला होणार नाही.
मा.हेमंत महाजन म्हणाले की,आपली लोककला टिकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.यात्रा कमिटी सोडून गावातील मद्यपान करणारे फड मालक ,कलावंतांना बोलतात , कलावंतांना नीट बसू व नीट जेवू देत नाहीत हे थांबले पाहिजे.
मा.हेमंत महाजन म्हणाले की, तिकीटावर चालणारे कार्यक्रम रसिक प्रतिसाद मिळत नसल्याने तमाशा फड आर्थिक अडचणीत आलेले आहेत.प्रत्येक वर्षी शासनाने तमाशाफडासाठी आर्थिक मदत केली पाहिजे.तसेच तमाशाचे फड तिकीटावर चांगले चालले पाहिजेत.
वरील प्रमाणे मत मा.हेमंत महाजन यांनी मांडलेले आहे.प्रत्येकाचे
अनुभव वेगवेगळे असतात.पटल तर घ्यावे.कोणाचा गैरसमज झाल्यास क्षमा करावी.
राजेंद्र.डी.मोरे
कलारसिक, बारामती
मो.न.८६८०९६१३७९
