मंचर-शिरूर रस्त्यावर वाढले अपघाताचे प्रमाण!!

मंचर-शिरूर रस्त्यावर वाढले अपघाताचे प्रमाण!!
मंचर-वैदवाडी फाटा (ता.आंबेगाव ) ते शिरूर या रस्त्यावर सध्या अपघाताचे प्रमाण वाढले असून शुक्रवार (दि.०४) रोजी दुपारी बारा एक वाजण्याच्या सुमारास शिरूर वरून वैदवाडी फाटा मार्गे मंचर वरून भीमाशंकरला जाणारी कार एम एच-१२, डब्ल्यू जे-५००७ या कार चालकाने पारगाव वैदवाडी फाटा मार्गे शिक्रापूरला जाणार्या दुचाकीला कारने चौकात जोरात धडक दिल्याने दुचाकी वरील एकाचा पाय फॅक्चर झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला.त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले.
जखमीची नावे व गाडीचा नंबर व कारचालकांची नावे मिळू शकली नाही.शिरूर पोंदेवाडी फाटा ते मंचरला जाणार हा एक रस्ता तर दुसरा पारगाव कारखाना वैदवाडी फाटा मार्गे लोणी,पाबळ, शिकापूरल जाणार रस्ता हे दोन्ही रस्ते महत्वाचे असून या दोन्ही मार्गावर लहान मोठी वाहानाची मोठी वर्दळ असते.शिवाय लहान गाडी असो किंवा मोठी गाडी असो गाड्याचा वेग जोरात असल्याने अपघाताची संख्या वाढल्याचे येथील युवाउघोजक सागर तापकीर व राहूल ढोबळे यांनी सांगितले आहे.
तसेच या दोन्ही रस्त्यावरून इतर मोठ्या प्रमाणात होणार्या वाहातूकी बरोबर शाळा कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते.बेल्हे जेजूरी व अष्टविनायक मार्गावर जसे अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे.तसेच या मार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहे.यासाठी वैदवाडी फाट्यावर चौकात चारही बाजूने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने गधिरोधक बसवावेत अशी मागणी आंबेगाव तालुका पोल्ट्री असोशियनचे अध्यक्ष प्रकाश तापकीर व स्थानिक नागरीकांनी केली आहे.
विशेष म्हणजे या चौकातील रस्त्यावर वैदवाडी फाटा येथे एकही गतिरोधक नाही.त्यामुळे या रस्त्याने वाहाने सुसाट धावतात.व अपघात होतात.सार्वजनिक बांधकाम विभागाने वैदवाडी जारकरवाडी फाटयावर त्वरीत गतिरोधक बसवावा अशी मागणी स्थानिक नागरीक व वाहान चालकांनी केली आहे.
मंचर शिरूर रस्त्यावर वैदवाडी फाटा येथे अपघात ग्रस्त वाहन