के.के.वाघ युनिव्हर्सल स्कूल तर्फे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन, वाचन संवाद,वाचन कौशल्य कार्यशाळा!!

के.के.वाघ युनिव्हर्सल स्कूल तर्फे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन, वाचन संवाद,वाचन कौशल्य कार्यशाळा!!
नाशिक (प्रतिनिधी)-निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथील के के वाघ युनिव्हर्सल स्कूल येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा याउपक्रमांतर्गत वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
वाचनाचे विद्यार्थ्यांच्या जीवनात असलेले महत्त्व दररोजच्या पाठ्यपुस्तक व्यतिरिक्त अवांतर पुस्तक वाचनाने आपल्या ज्ञानात पडणारी भर तसेच मोबाईलचा अतिरिक्त वापरा मुळे मुलांचा आरोग्यावर होणारे घातक परिणाम व वाचनावर झालेला परिणाम दूर करण्यासाठी मुलांना ग्रंथालयाकडे पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी तसेच शालेय जीवनात वाचनाचे महत्त्व विद्यार्थिनी समोर स्पष्ट करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब मोंढे ,प्रमुख अतिथी प्रा.यशवंत ढगे, भाऊसाहेब मोते,(सा.वा.ना ग्रंधापाल) प्रा.संजय धनगर (लेखक) श्रीमती योगिता पवार आदी उपस्थित होते . यावेळी के.के.वाघ युनिव्हर्सल स्कूल सीबीएससी च्या विद्यार्थ्यांनी “सामूहिक वाचन, वाचन संवाद,वाचन कौशल्य” या संकल्पनेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती ज्योती भंडारे यांनी केले. तसेच कार्यक्रमासाठी अथक परिश्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतले.