शिरदाळे(ता.आंबेगाव) येथे जयहिंद वाचनालयाच्या माध्यमातून वाचन कट्टा सत्र संपन्न!!

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथे जयहिंद वाचनालयाच्या माध्यमातून वाचन कट्टा सत्र संपन्न!!
शिरदाळे(ता.आंबेगाव) येथे जयहिंद वाचनालय धामणी यांच्या पुढाकाराने “वाचन कट्टा” सत्र संपन्न झाले. यामध्ये जयहिंद वाचनालयाचे सेक्रेटरी मा.डॉ.सुरेश बेरी यांनी यामध्ये “शिवाजी कोण होता?” या गोविंद पानसरे लिखित पुस्तकावर मार्गदर्शन केले.यामध्ये हे पुस्तक अतिशय सुंदर असून प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे असे आवाहन त्यांनी केले.
तर ह.भ.प.तान्हाजी महाराज तांबे आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे श्री.गोरक्ष तांबे यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे आणि खाऊचे वाटप श्री.गोरक्ष तांबे यांच्या तर्फे करण्यात आले. यावेळी मा.सैनिक शिवाजी सरडे,मा.तंटामुक्ती अध्यक्ष स्वप्नील तांबे,विठ्ठल तांबे गुरुजी,मा.सरपंच केरभाऊ तांबे,शरद जाधव,संतोष जाधव,श्रीकांत मिंडे,शुभम तांबे,सोमनाथ तांबे,किशोर रणपिसे,रोहित रणपिसे,श्रीनाथ तांबे,सोहम चौधरी,राज तांबे,ओम रणपिसे,ऋत्विक सरडे,सोहम रणपिसे आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार मा.उपसरपंच श्री.मयुर सरडे यांनी मानले.