गट विकास अधिकारी (बी.डी.ओ)प्रमिला वाळूंज थेट कबड्डीच्या मैदानात!!

गट विकास अधिकारी (बी.डी.ओ) प्रमिला वाळूंज थेट कबड्डीच्या मैदानात!!
माणूस कितीही मोठा झाला, कुठल्याही मोठ्या पदावर गेला तरी त्याला आपल्या लहानपणाच्या शालेय जीवनातल्या आठवणी, छंद नेहमी स्मरणात असतात, शालेय जीवनात जोपासलेले छंद ल,आवड ही ते नेहमी जपत असतात.अशीच आपली आवड जपण्याची एक सुखद घटना नुकतीच घडली.
निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालायत तालुक्याच्या बी.डी.ओ.प्रमिला वाळूंज यांनी थेट शालेय विद्यार्थिनी सोबत कबड्डीच्या मैदानात कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला आहे.
निरगुडसर विद्यालयात आंतरशालेय क्रिडा स्पर्धा आयोजीत केल्या होत्या.त्यावेळी आंबेगाव तालुक्याच्या बि.डी.ओ.प्रमिला वाळुंज यांनी स्पर्धेचे उद्दघाटन केले.त्यावेळी त्यांनी थेट मुलींबरोबर मैदानात कबड्डीची एन्ट्री मारत कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला.
लहानपणी शालेय जीवनात असताना बी.डी.ओ.वाळूंज उत्तम प्रकारे कबड्डी खेळत असत असे त्यांनी सांगितले.भरगच्च मैदानात मुली कबड्डी खेळताना पाहून त्यांनाही कबड्डी खेळण्याचा मोह आवरला नाही व त्यांनी मुलींबरोबर कबड्डी खेळण्याचा आनंद लूटला.
यावेळी संस्थेचे उपाध्याक्ष रामदास वळसे पाटील, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोहकरे, प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे उपस्थित होते.
या आंतरशालेय क्रिडा स्पर्धेचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली करण्यात आले होते. क्रिडा स्पर्धेचे नियोजन क्रिडा शिक्षक भरत खिलारी यांनी केले होते. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.