आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे जागतिक मत्स्य दिन उत्साहात साजरा!!

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे जागतिक मत्स्य दिन उत्साहात साजरा!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

जागतिक मत्स्य दिनानिमित्य मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे, ऑरगॅनिक बायोटेक, मुंबई व मत्स्यसेवा केंद्र, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने मंचर तालुका आंबेगाव येथे एक दिवसीय मत्स्यव्यवसाय कार्यशाळा हॉटेल फीश थाळी येथे आयोजित करण्यात आली .

सदर कार्यशाळेत १०१ मच्छिमार, मत्स्य शेतकरी,मत्स्यव्यवसायिक, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था सभासद यांनी हजेरी लावली होती.

सदर कार्यशाळेत पुणे मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी किरण वाघमारे यांनी जागतिक मत्स्य दिनाचे महत्व व मच्छिमारांसाठी लाभकारी योजना जसे की, ई – श्रम कार्ड, किसान क्रेडिट कार्ड (KCC) व मत्स्यव्यवसाय व निगडित व्यवसाय करणाऱ्यासांठी निशुल्क इन्शुरन्स व शासकीय योजनांची माहिती दिली.

ऑरगॅनिक बायोटेक चे संशोधक डॉ. प्रफुल रणदिवे व रोहित मंडले यांनी मत्स्यशेती (अक्वा कलचर) मध्ये प्रोबायोटीक वापराचे फायदे मत्स्यपालनात येणाऱ्या अडचणी बाबत मार्गदर्शन केले.

मत्स्यदिनाचे औचित्य साधून आलेल्या सर्व मच्छिमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यवसायिक यांना मासळी पासून बनविलेले मूल्यवर्धित पदार्थाचे आस्वाद घेतला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष खामकर, मत्स्यव्यवसायिक मंचर, राहुल गायवळ, मत्स्यसेवा केंद्र, पुणे, तर मत्स्यव्यवसाय विभागाचे भिमाशंकर पाटील, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, कनिष्ठ लिपिक लालासो कदम, समाधान शिंदे, रोहीत मंडले व ऋतुजा निवसे यांनी परिश्रम घेतले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.