आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

धामणी(ता.आंबेगाव)येथे बिबट्याचा हल्ला!!दहा कोंबड्या आणि पाच शेळ्या फस्त!!

धामणी(ता.आंबेगाव)येथे बिबट्याचा हल्ला!!

दहा कोंबड्या आणि पाच शेळ्या फस्त!!

धामणी येथे बोऱ्हाडे मळा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून दहा कोंबड्या आणि पाच शेळ्या फस्त केल्याची घटना घडली आहे. सुनील तुकाराम बोऱ्हाडे यांच्या घरासमोरील गोठ्यामधून रात्री हा प्रकार समोर आला असून यामुळे बोऱ्हाडे परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाचे कर्मचारी दिलीप वाघ यांनी आपला सहकारी कल्पेश बढेकर यांच्यासह त्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला असून या कुटुंबाला मदत मिळण्यासाठी सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्याठिकाणी पंचायत समिती सदस्य रविंद करंजखेले,शिरदाळे मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी भेट देऊन घडलेल्या प्रकारची माहिती घेतली तसेच या कुटुंबाला मदत मिळावी अशी विनंती केली. यावेळी मा.उपसरपंच विक्रम बोऱ्हाडे,भाऊसाहेब करंडे,पोपट बोऱ्हाडे,नितीन बोऱ्हाडे,संकेत बोऱ्हाडे यांनी मदत करून आजूबाजूला पडलेल्या कोंबड्या आणण्याचा प्रयत्न केला परंतु काही सापडल्या तर काही सापडल्या नाहीत.

एवढे मोठे नुकसान म्हणजे एका कुटुंबावर मोठा घाला असून वनविभागाने त्वरित यावर नियंत्रण आणण्यासाठी पिंजरा लावावा कारण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.