भारत राखीव बटालियन क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात संपन्न!!
भारत राखीव बटालियन क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात संपन्न!!
डॉ सुरेश राठोड: कोल्हापूर
कोल्हापुरातील नांदवळ (ता. करवीर) येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक16, भारत बटालियन 3 यांच्या पार पडलेल्या 9 व्या आंतरराष्ट्रीय कंपनी पोलीस क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ दिमाखात पार पडला.
राज्य राखीव पोलीस दलाचे कमांडंट श्रीमती नम्रता पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी, असिस्टंट कमांडंट गोविंद हिंगरुपे, सदांशिव, पोलीस निरीक्षक, अजय लीपरे, तांदळे, पोलीस उपनिरीक्षक, महेश साळुंखे, गुप्ता, शेळके, गुजर, माने, सावंत, गुजर उपस्थित होते.
सी कंपनी यांना सर्वसाधारण विजेते पद मिळाले असून, उपविजेता पद स्थानिक कंपनी यांना मिळाले या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणजे बेस्ट ॲथलेटिक्स सुरज पाटील सी कंपनी यांना मिळाले. अवधेश गुप्ता व अजय लिपारे यांचे मोठे मार्गदर्शन लाभले. आभार सहाय्यक कमांडंट सदानंद सदांशिव यांनी मांडले तर सूत्रसंचालन अशोक गुजर यांनी केले.
या कार्यक्रमाला दै.रोखठोक चे कार्यकारी संपादक डॉ. सुरेश राठोड, उद्योजक डॉ.सुशील अग्रवाल, सर्व अधिकारी, अमलदार व त्यांचे कुटुंबीय, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.