शिरदाळे येथे बिबट्याचा दहशतीमुळे बसविला पिंजरा!!
बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर वनविभागाने दाखवली सतर्कता!!

शिरदाळे येथे बिबट्याचा दहशतीमुळे बसविला पिंजरा!!
बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर वनविभागाने दाखवली सतर्कता!!
शिरदाळे येथे गेल्या आठवड्यात झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या होत्या.त्यानंतर ग्रामपंचायतने वनविभागाकडे पिंजरा बसवण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाच्या धामणी क्षेत्राच्या वनपाल सौ.सोनल भालेराव यांच्या सूचनेवरून वनविभागाचे शिपाई दिलीप वाघ तसेच कल्पेश बढेकर यांनी शिरदाळे येथे पिंजरा बसविला. यावेळी ग्रामस्थ म्हणून श्रीकांत मिंडे,उत्तम रणपिसे,प्रतीक तांबे हे मंडळी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून वारंवार बिबट्या पाहायला मिळत असल्याने ग्रामस्थांची आणि ग्रामपंचायतीची मागणी होती.पिंजरा जरी बसवला असला तरी ग्रामस्थांनी सतर्क राहावे अशी विनंती शिरदाळे सरपंच जयश्री तांबे,उपसरपंच बिपीन चौधरी,मा.सरपंच मनोज तांबे,गणेश तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी केली. तसेच विशेष काळजी लहान मुलांनी घ्यावी.तसेच रात्रीच्या वेळी अंगणात फिरू नये असे देखील आवाहन यावेळी करण्यात आले.
शिरदाळे येथे झालेल्या बिबट्याचा हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या होत्या.त्यानंतर आम्ही वनविभागाकडे पिंजरा बसवण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने त्वरित यावर कार्यवाही करून पिंजरा बसवण्यात आला आहे. पहिल्यांदाच असा हल्ला झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच शेतकऱ्यांना बऱ्याचदा बिबट्याचे दर्शन झाल्याने आणि बिबट्याचा वावर वाढल्याने हा पिंजरा बसवल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने वनविभागाचे धन्यवाद.
श्री.मयुर सरडे
(उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस/मा.उपसरपंच शिरदाळे)