आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनसामाजिक

पारगाव (शिंगवे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी रंगून गेले पायी दिंडी सोहळ्यात!!

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळाने या दिंडीला भजनाची साथ दिली. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषात संपूर्ण पारगाव नगरी भक्तीरसात चिंब न्हाऊन गेली होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून टाळ मृदुंगाच्या गजरात सुरू झालेल्या दिंडीने गावप्रदक्षिणा पूर्ण केली.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) हे गाव धार्मिक परंपरांमुळे संपूर्ण राज्यात ओळखले जाते. घोड नदीच्या तीरावर ती वसलेले पारगाव सर्व अर्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळखले जाते.अध्यात्माच्या जोडीला विज्ञानाची साथ मिळते आहे.ज्यामुळे गावाचा सर्वार्थाने विकास झालेला आहे.

या प्रसंगी पारगावच्या लोकनियुक्त सरपंच श्वेता किरण ढोबळे,ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे तज्ञ संचालक शिवाजी लोखंडे सर,मा. अध्यक्ष बजरंग देवडे,सदस्य शंकर देवडे,उपाध्यक्ष सचिन दातखिळे, सामाजिक कार्यकर्ते भागचंद पोंदे, चंद्रकांत लोखंडे,साईनाथ गायकवाड,किशोर आस्वारे,सुनील चांगण ग्रामपंचायत सदस्य व सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

या संपूर्ण वारीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक लबडे सर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.