आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनसामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) येथील चिमुकली रंगली बालदिंडी सोहळ्यात!!


पंचनामा निरगुडसर प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे व अंगणवाडी जवळे यांचा बालदिंडी सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला. सालाबादप्रमाणे याही वर्षी चिमुकल्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शाळेच्या मुख्याध्यापिका सविता गांजाळे,सहशिक्षक संतोष आचार्य यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केलं.

या वेळी लहान लहान मुलांनी अतिशय सुंदर अशी वेशभूषा परिधान करून साक्षात लहान विठ्ठल रखुमाई चे दर्शन घडवले.मुलांनी विठ्ठल रुक्माईची पालखी,भगव्या पताका व हरिनामाचा गजर करत गाव प्रदक्षिणा केली.यामध्ये महिला भगिनींनी फुगड्या घालून आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी आदर्श सरपंच सौ वृषालीताई उत्तम शिंदे पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिता वाळुंज,उपसरपंच मनीषा टाव्हरे, अंगणवाडी सेविका शालन सोनवणे, खालकर मॅडम,मदतनीस शशिकला गावडे,तसेच भजन मंडळ दिनकर वाळुंज, पांडुरंग बोराटे,निवृत्ती शिंदे,अशोक लोखंडे,किसन अभंग,बबनराव लोखंडे,रामनाथ पवार,रामा बोराटे,लहू बोराटे, बापूसाहेब गायकवाड ,एकनाथ वाघ,ज्ञानदेव वाळुंज,संभाजी बोराटे, रमेश खेडकर,किसन लोखंडे, तुषार टाव्हरे,अरुण वाळुंज, गोरक्षनाथ वाळुंज सुखदेव टाव्हरे,अशोक लायगुडे,अण्णासाहेब लायगुडे, सचिन शिंदे ,योगेश गावडे,मच्छिंद्र लायगुडे, ज्ञानेश्वर खालकर, असंख्य महिला भगिनी,पालक वर्ग,मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी सर्वांसाठी खिचडीचा महाप्रसाद, राजगिरा लाडू, केळी ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आले होते त्या सर्वांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.