आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यामिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च मध्यामिक विद्यालयात संपन्न झाला पायी दिंडी सोहळा!!

पंचनामा निरगुडसर प्रतिनिधी – विठ्ठल विठ्ठल माझा,मी विठ्ठलाचा,रामकृष्ण हरी,जय जय राम कृष्णहारी या हरिनामाने निरगुडसर परिसर दणाणून गेला होता. निमित्त होते पंढरपूर आषाढी एकादशीचे.निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडित जवाहरलाल नेहरू मध्यामिक व द.गो.वळसे पाटील उच्च मध्यामिक विद्यालयाने पंढरपूर आषाढी एकादशीचे निमित्त साधून गावामधून विद्यार्थ्यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल, रुक्मिणी,संत तुकाराम अशा वेशभूषा धारण केल्या होत्या. त्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सादरीकरण करण्यात आले होते.टाळ,मृदुंगाचा ताल धरत विद्यार्थ्यांनी प्रतिरूप दिंडी सोहळा सादर केला होता.या दिंडी सोहळ्याचे ग्रामस्थांनी कौतिक करून शाबासकी दिली.

निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शांनाखाली संस्थेचे उपाध्यक्ष रामदास वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दिंडी सोहळ्याचे प्रस्थान विद्यालयातून करण्यात आले.गावाला वळसा घालून दिंडीने बस स्थानकावर नेत्रदिपक रिंगन सोहळा पार पाडला.नंतर दिंडीने निरगुडेश्र्वराचे दर्शन घेऊन पुढे विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान केले.या ठिकाणी सुरेश टाव्हरे,भगवान टाव्हरे,पायल गवारी,श्रावणी टाव्हरे,बाजीराव वळसे गुरुजी यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. सरपंच रवि वळसे पाटील यांनी विद्यालयाच्या या दिंडी सोहळ्याचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करून कौतूक केले.यापुढे अशा कार्यक्रमाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.नंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने देवाची आरती करण्यात आली.पसायदानाने दिंडीची सांगता करण्यात आली.

सदर दिंडी कार्यक्रम आयोजन विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमूख विनोद बारवकर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.या दिंडी सोहळ्यात प्राचार्य कांताराम टाव्हरे,पर्यवेक्षक संतोष वळसे तसेच ग्रामस्थ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.