आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे शूरवीर जीवा महाले नाभिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री.संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न!!
आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे शूरवीर जीवा महाले नाभिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री.संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न!!
आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे शूरवीर जीवा महाराज नाभिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री.संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न झाली.
यावेळी सकाळी प्रतिमा पूजन संपन्न झाले. त्यानंतर हरिनामाच्या गजरात प्रतिमेची भव्य मिरवणूक पार पडली. या वेळी ह. भ.प. बाळशिराम महाराज मिंडे यांचे हरिकीर्तन पार पडले.नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने पार पडला.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती देवदत्त निकम,पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, संचालक माऊली शेठ अस्वारे, संचालक दौलत भाई लोखंडे,गणपतराव क्षिरसागर, दत्तात्रेय देवडे, मा.सरपंच बबनराव ढोबळे,निवृत्ती ढोबळे,सुनील शिंदे, दीपक साबळे,साईनाथ गायकवाड, तेजस जगताप,गोकुळ देवडे,माऊली देवडे,नंदू नाना देवडे,रत्नाकर कोराळे,दत्ता जाधव,सचिन देवडे,बजरंग देवडे, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.