पोखरी येथे आत्मा अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन..
पोखरी येथे आत्मा अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन..
प्रतिनिधी-समीर गोरडे
महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन संजय काचोळे प्रकल्प संचालक आत्मा पुणे तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पुणे व श्रीधर काळे प्रकल्प उपसंचालक आत्मा पुणे,नरेंद्र वेताळ तालुका कृषि अधिकारी आंबेगाव,रामचंद्र बारवे मंडल कृषि अधिकारी डिंभे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले होते त्यामध्ये पशुपालक शेतक-यांसाठी पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रामामध्ये धनेश पडवळ साहेब पशुसंवर्धन विषय तज्ञ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी पशुधनाचे आरोग्य व चारा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. निलेश लगड साहेब पशुसंवर्धन तज्ञ मार्गदर्शक ए बी एस इंडिया यांनी पशुप्रजननातील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले ज्ञानेश्वर लोहकरे कृषी सहाय्यक पोखरी यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धोंडीभाऊ पाबळे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आंबेगाव यांनी केले व सुत्रसंचालन चंद्रकांत डामसे कृषी पर्यवेक्षक यांनी केले सदर कार्यक्रमासाठी प्रकाश आंबेकर कृषी पर्यवेक्षक ,अरविंद मोहरे,योगेश पारधी कृषी सहाय्यक ,वैभव तोरे बायफ संस्थेचे प्रतीनिधी व सुनील विधाते आय सी आय सी फाऊंडेशन प्रतिनिधि कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी अशोक कोळप चेअरमन यांनी कार्यक्रमासाठी योगदान दिले. सदर कार्यक्रमासाठी विजय केंगले पोलीस पाटील राजेवाडी,नामदेव पुताजी दांगट मा.उपसरपंच व परीसरातील डेअरीचे सभासद पशुपालक व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.